---Advertisement---

‘….आणि माही कॅप्टन बनला!’ धोनीच्या कर्णधार बनण्याची इनसाईड स्टोरी

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 4:04 PM
dhoni-sharad-pawar
---Advertisement---

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी (Ratnakar Shetty) यांनी बीसीसीआयमधील त्यांच्या कार्यकाळातील दिवसांवर एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक नवीन गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी अनिल कुंबळे-विराट कोहली यांच्यातील वाद, सौरव गांगुलीची टी२० विश्वचषक खेळण्याची इच्छा, एमएस धोनीच्या कर्णधार होण्याचा किस्सा याबाबत लिहिले आहे. रत्नाकर शेट्टी यांनी लिहिले आहे की, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरने धोनीला कर्णधार बनवण्याचे समर्थन केले होते. (Ratnakar Shetty Book)

‘ऑन बोर्ड: माय इयर्स इन बीसीसीआय’ या पुस्तकात रत्नाकर शेट्टी यांनी धोनीच्या भारतीय संघाचा कर्णधार होण्याबाबत लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, प्रथम राहुल द्रविडने भविष्यातील कर्णधार म्हणून धोनीचे नाव घेतले. त्यानंतर तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार (BCCI President Sharad Pawar) यांनी सचिनला याबाबत विचारले असता, त्यानेही तेच नाव सांगितले. (Rahul Dravid Suggest Dhoni Name As India Captain)

शेट्टी यांच्या पुस्तकानुसार, ‘आयपीएलच्या संकल्पनेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी राहुलने मला बीसीसीआय अध्यक्षांशी एकांतात भेटायचे असल्याचे सांगितले. मी अध्यक्षांना याबद्दल सांगितले. त्यांनी राहुलला त्यांच्या खोलीत बोलावले. राहुल काही मिनिटांनी खाली आला आणि मला लॉबीत भेटला. त्याने मला सांगितले की, त्याला फ्लाइट पकडायची आहे आणि तो लगेच निघून गेला. तो अधिकृत डिनरसाठीही थांबला नाही. मला पुन्हा अध्यक्षांचा फोन आला. मी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा मला कळले की, राहुलने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी टी२० विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी राहुलचा राजीनामा सार्वजनिक करण्यात आला होता.’

शेट्टी यांनी पुढे लिहिले आहे की,
‘अध्यक्षांनी जेव्हा राहुलला विचारले की, तुझा उत्तराधिकारी कोण असेल? तेव्हा राहुलने धोनीची शिफारस केली. तेव्हा धोनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. अध्यक्षांनी सचिनला हाच प्रश्न विचारला. सचिन त्यावेळी झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर उपकर्णधार होता. डिनर वेळी सचिनने अध्यक्षांना द्रविडने कोणाचे नाव सुचवले, असे विचारले. त्यांनी धोनीचे नाव सांगतानि सचिनही अनुमोदन दिले.

धोनी बनला पूर्णवेळ कर्णधार
धोनी २००७ मध्ये पहिल्या भारतीय टी२० संघाचा कर्णधार झाला. त्यानंतर राहुल द्रविडच्या जागी त्याची भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २००८ मध्ये धोनीची अनिल कुंबळेच्या जागी कसोटी संघाचा भारताचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. धोनी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झाला तेव्हा तो खूपच तरुण होता. मात्र, त्याला वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग यांसारख्या खेळाडूंपेक्षा प्राधान्य दिले गेले.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---