पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत रावेतकर मस्कीटर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत रावेतकर मस्कीटर्स संघाने किर्पान्स संघाचा 570-508 असा पराभव करून आगेकूच केली. सामन्यात टेनिस प्रकारात पराग चोपडा, रोहन दळवी, सार्थक प्रधान, करण बापट, अर्णव काळे, शैलेश लिमये, अभिजीत शहा, चिन्मय दांडेकर, वेद मोघे, समिर सावंत यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रावेतकर मस्कीटर्स संघाने किर्पान्स संघाचा 183-158 असा पराभव करून आघाडी घेतली. टेबल टेनिस प्रकारात रावेतकर मस्कीटर्स संघाने किर्पान्स संघाचा 240-121 असा पराभव करून विजयी आघाडी घेतली. बॅडमिंटन प्रकारात रावेतकर मस्कीटर्स संघाला किर्पान्स संघाकडून 147-229 असा पराभवाचा सामना करावा लागला.
दुसऱ्या सामन्यात समुराईज् संघाने लान्सर्स संघाचा 577-508 असा पराभव करून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
समुराईज् वि.वि लान्सर्स – 577-508
टेनिस – समुराईज् वि.वि लान्सर्स 169-141(अमित नाटेकर/अवनी गोसावी पराभूत वि कल्पक पत्की/सन्मय तेलंग 18-30, नकुल फिरोदीया/निशांत भणगे वि.वि तुषार नगरकर/आलोक तेलंग 30-18, अमित महाजनी/विमल हंसराज वि.वि नरेंद्र बापट/अरिन माळी 30-19, आदित्य अभ्यंकर/सौरभ चिंचणकर वि.वि सिध्दार्थ निवसरकर/पराग टेपण 30-26, आशुतोष सोमण/शारदा बापट पराभूत वि अमेय वाकणकर/जान्हवी कोरे 21-30, अमर श्रॉफ/यश शहा पुढे चाल .वि विक्रांत पाटील/अनिश राणे 20-0, आनंद घाटे/सचिन बेलगलकर वि.वि सत्यजीत लिमये/नकुल बेलवलकर 20-18)
टेबल टेनिस – समुराईज् पराभूत.वि लान्सर्स 186-206(सचिन बेलगलकर/नितीन कोंकर वि.वि तुषार नगरकर/जयंत महाबोले 30-29, आशिष बोडस/आनंद घाटे पुढे चाल वि मिहिर ठोंबरे/सिध्दार्थ निवसरकर 0-30, अमित नाटेकर/आदित्य अभ्यंकर पराभूत वि नकूल बेलवलकर/विक्रांत पाटील 28-30, संजय शहा/सौरभ चिंचणकर वि.वि आलोक तेलंग/ कल्पक पत्की 30-17, विमल हंसराज/विनीत रूकारी पराभूत वि अनिश राणे/चैत्राली नवरे 13-30, अमित महाजनी/शारदा बापट वि.वि अमोद प्रधान/अनिल देडगे 30-23, निशांत बनगे/विजय राठोड वि.वि आशिष देसाई/आश्विन माळी 30-26, आशुतोष सोमण/हेमंत पालंडे वि.वि गोपी शेवाळे/विक्रम मोगळे 30-21)
बॅडमिंटन – समुराईज् वि.वि लान्सर्स 222-191(कुणाल पाटील/आकाश सुर्यवंशी पराभूत वि अनिश राणे/विक्रांत पाटील 20-30, नितीन कोंकर/विनित रूकारी पराभूत वि तुषार नगरकर/सिद्धार्थ निवसरकर 22-30, अमर श्रॉफ/अनिकेत सहस्रबुध्दे वि.वि चैत्राली नवरे/अनिल देडगे 30-22, विमल हंसराज/आनंद घाटे वि.वि आलोक तेलंग/आमोद प्रधान 30-25, अमित नाटेकर/हेमंत पालांडे वि.वि विक्रम ओगळे/नकुल बेलवलकर 30-27, निशांत भनगे/विजय राठी वि.वि कल्पक पत्की/ रमनलाल जैन 30-29, जयकांत वैद्य/आदित्य अभ्यंकर वि.वि सत्यजीत लिमये/अनया राजवाडे 30-16, यश काळे/यश शहा वि.वि आनंदीता गोडबोले/ अरिन माळी 30-12);
रावेतकर मस्कीटर्स वि.वि किर्पान्स 570-508
टेनिस – रावेतकर मस्कीटर्स वि.वि किर्पान्स 183-158(पराग चोपडा/रोहन दळवी वि.वि तन्मय चोभे/अनिश पाटणकर 30-27, सार्थक प्रधान/करण बापट वि.वि हिमांशू गोसावी/अजिंक्य मुथे 30-28, रोनित मुथा/प्रियदर्शन डुंबरे पराभूत वि. अंकुश मोघे/रिया वाशिमकर 28-30, अर्णव काळे/ शैलेश लिमये वि.वि क्षितिज नाहर/अनूज मेहता 30-17, अभिजीत शाह/चिन्मय दांडेकर वि.वि भाग्यश्री देशपांडे/शिरीष साठे 30-25, वेद मोघे/समीर सावंत वि.वि आश्विन हळदणकर/निनाद देशमुख 20-11, आदित्य गांधी/अनुष्का परांजपे पराभूत वि चिन्मय चिरपुटकर/समिर जोशी 15-20)
टेबल टेनिस – रावेतकर मस्कीटर्स वि.वि किर्पान्स 240-121(पराग चोपडा/संजय बामने वि.वि अनूत मेहता/भाग्यश्री देशपांडे 30-7, शिरीष कर्णीक/वैशाली सोहनी वि.वि किरण गर्गे/तन्मय चोभे 30-24, अतूल ठोंबरे/नितीन पेंडसे वि.वि अजिंक्य मुथे/अनिश पाटणकर 30-14, सार्थक प्रधान/शैलेश लिमये पुढे चाल वि. क्षितिज नाहर/शिरीष साठे 30-0, आदित्य पावनगडकर/संदीप साठे वि.वि चिन्मय चिरपुटकर/समीर जोशी 30-13, रोहन दळवी/करण बापट वि.वि सुदर्शन बिहानी/ईशान लागू 30-25, विनायक भिडे/आदित्य गांधी वि.वि तेजस्विनी चावडा/ निनाद देशमुख 30-25, अभिजीत शहा/प्रियदर्शन डुंबरे वि.वि अश्विन हळदणकर/अंकूश मोघे 30-13)
बॅडमिंटन – रावेतकर मस्कीटर्स पराभूत.वि किर्पान्स 147-229(नैमिश पाळेकर/आदित्य गांधी पराभूत वि क्षताक्षी किणीकर /वृशी फुर्ला 29-30, पराग चोपडा/आदिती रोडे पराभूत वि तन्मय चोभे/अभिजीत राजवाडे 21-30, आदित्य पावनगडकर/सचिन जोशी पराभूत वि अजिंक्य मुथे/निनाद देशमुख 0-30, रोनित मुथा/स्वरूप कुलकर्णी पराभूत वि ऋशिकेष पेंडसे/सुदर्शन बिहानी 10-30, समिर सावळा/ विनायक भिडे पराभूत वि ईशान लागू/पार्थ केळकर 15-30, शैलेश लिमये/संदीप साठे पराभूत वि अनूज मेहता/ चिन्मय चिरपुटकर 25-30, वेद मोघे/शिरीष कर्णीक पराभूत वि अंकुश मोघे/मिताली कुलकर्णी 17-30, अतुल ठोंबरे/सार्थक प्रधान वि.वि समीर जोशी/ रिया वाशिमकर 30-29)
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीला आतापर्यंत लाभलेत ६ कर्णधार, फाफ असेल सातवा; जाणून घ्या आतापर्यंतच्या कॅप्टन्सचे आकडे
मास्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या कल्याणी जोशीला सुवर्ण
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी