सध्या वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (Icc under 19 World Cup) थरार सुरू आहे. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. शनिवारी (२९ जानेवारी) या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारत आणि बांगलादेश (India under 19 vs Bangladesh under 19) हे दोन संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाज रवी कुमारने असा काही चेंडू टाकला होता ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
भारतीय संघातील युवा गोलंदाज रवी कुमारने (Ravi Kumar) बांगलादेश संघातील फलंदाजांना आपल्या वेगवान गोलंदाजीने आश्चर्यचकित केले होते. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेशच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ज्यामुळे बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १११ धावांवर संपुष्टात आला होता.
रवी कूमारचा अप्रतिम चेंडू
तर झाले असे की, प्रथम बांगलादेश संघाची प्रथम फलंदाजी सुरू असताना, दुसरे षटक टाकण्यासाठी रवी कुमार गोलंदाजीला आला होता. डाव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने ओव्हर द विकेटचा मारा करायला सुरुवात केली. त्यावेळी षटकातील तिसऱ्या चेंडूवर फलंदाज महफिजुल इस्लामने (Mahfijul Islam) सरळ येणारा चेंडू समजून मिड विकेटच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेत स्विंग होत येणारा चेंडू टप्पा पडताच आणखी जास्त स्विंग झाला आणि फलंदाजाला त्रिफळाचित होऊन माघारी जावे लागले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CZUNeU0lDOU/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला अवघ्या १११ धावा करण्यात यश आले होते. बांगलादेश संघाकडून मेहरोबने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. हे आव्हान भारतीय संघाने ३१ व्या षटकात पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या :
मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सच्या रणनितीचा झाला खुलासा; वाचा सविस्तर
PHOTO: केवळ क्रिकेटच नाहीतर ‘या’ खेळाचाही उस्ताद आहे संजू सॅमसन; पाहा व्हायरल फोटो
हे नक्की पाहा: