वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (ICC under 19 World Cup) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सामना गमावला नाहीये. तसेच शनिवारी (२९ जानेवारी) या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज रवी कुमारने गडी बाद केल्यानंतर हटके सेलिब्रेशन केले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने बांगलादेश संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १११ धावांवर संपुष्टात आणला होता. तर या धावांचा पाठलाग करताना ५ गडी राखून विजय देखील मिळवला होता. ज्यामध्ये संघातील वेगवान गोलंदाज रवी कुमारने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ७ षटक गोलंदाजी केली आणि अवघ्या १४ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. (Ravi Kumar celebration)
रवी कुमारचे हटके सेलिब्रेशन
रवी कुमारने या सामन्यात माहफिजुल इस्लामला बाद करत आपले खाते उघडले. डाव्या हाताच्या या गोलंदाजाने ओव्हर द स्टंपचा मारा करत, अप्रतिम चेंडू टाकला होता. जो टप्पा पडताच आत आला होता. दरम्यान, हा गडी बाद केल्यानंतर त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डो स्टाईलमध्ये हटके सेलिब्रेशन केले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CZUTh7MlCmU/?utm_medium=copy_link
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला अवघ्या १११ धावा करण्यात यश आले होते. बांगलादेश संघाकडून मेहरोबने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. हे आव्हान भारतीय संघाने ३१ व्या षटकात पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या :
हे नक्की पाहा: