---Advertisement---

मुंबई प्रशिक्षक निवडीचा वाद पोहोचला कोर्टात, माजी अध्यक्षांनी दाखल केली याचिका

On: शनिवार, जून 5, 2021 7:36 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट वर्तुळातील सर्वोत्तम संघ म्हटल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाला नुकतेच नवे प्रशिक्षक लाभले आहेत. २ जून रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबईच्या देशांतर्गत संघाचा दिग्गज फलंदाज अमोल मुजुमदार यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. मात्र, आता ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, एमसीएच्याच माजी अध्यक्षांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.

माजी अध्यक्षांनी दाखल केली याचिका
एमसीएचे माजी अध्यक्ष रवी सावंत अमोल मुजुमदार यांची निवड घटनाबाह्य असल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले, “माझा अमोलशी काहीही वैयक्तिक वाद नाही. मात्र एमसीएने त्याची निवड असंवैधानिक मार्गाने केली आहे. ही पूर्ण प्रक्रिया चुकीची होती.”

सावंत यांनी पुढे बोलताना म्हटले, “मुंबईच्या प्रशिक्षकाची नेमणूक घटनेतील तरतुदीनुसार एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीद्वारे (सीआयसी) केली जाते, पदाधिकार्यांमार्फत नाही. यापूर्वीही या नियुक्त्यांबाबत सीआयसीने पदाधिकारी किंवा अ‍ॅपेक्स कौन्सिलशी कधीही सल्लामसलत केलेली नाही.”

एमसीए सीआयसीचे अध्यक्ष लालचंद राजपूत असून त्यामध्ये माजी रणजीपटू राजू कुलकर्णी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू समीर दिघे यांचा समावेश आहे.

अमोल मुजुमदार यांची राहिली मोठी कारकीर्द
एमसीएने २०२१-२०२२ या वर्षासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केलेले अमोल मुजुमदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात मोठे नाव आहे. त्याने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत १७१ सामने खेळताना ११,१६७ धावा काढल्या आहेत. यामध्ये तब्बल ३० शतकांचा समावेश आहे. निवृत्तीनंतर त्याने दक्षिण आफ्रिकेचा तसेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले.

महत्त्वाच्या बातम्या-

विरोधी संघावर ‘त्याचा’ प्रभाव असा पडतो, जसा पुर्वी सेहवाग-गिलख्रिस्टचा असायचा; कार्तिकचे भाष्य

भारतीय क्रिकेटप्रेमींना धक्का! टी२० विश्वचषक गेला भारताबाहेर? युएईसह ‘या’ देशात होणार आयोजन

अझरुद्दीन यांना आठवला त्यांचा खास स्कूटर; म्हणाले, ‘तो माझ्यासाठी लक्झरी होता’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---