टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल् विराट कोहली (Virat Kohli) ठरला. नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याने अशक्यप्राय वाटणारा विजय अक्षरशा खेचून आणला. मागील काही काळापासून अपयशी ठरत असलेल्या विराटवर टीका केली जात होती. मात्र, या खेळीने त्याने सर्वांची तोंडे बंद केली आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराटबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
केएल राहुल दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर विराट फलंदाजासाठी मैदानात उतरला. तो मैदानात आल्यानंतर सातव्या षटकापर्यंत भारताने चार गडी गमावले होते. त्यानंतर त्याने हार्दिक पंड्यासह 103 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या या खेळीनंतर अजूनही त्याचे कौतुक केले जात आहे.
एका प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शास्त्री म्हणाले,
“विराटच्या या खेळीने अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र मला नाही. मला माहित होते ऑस्ट्रेलियात ही खेळी येणार आहे. त्याला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडते. त्याने मोठ्या संधीचा फायदा घेत मोठी खेळी केली.”
विराटने या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याला लगावलेल्या षटकाराची तुलना सचिन तेंडुलकरने 2003 विश्वचषकात शोएब अख्तरला मारलेल्या षटकाराशी केली. त्याचवेळी त्यांनी असे देखील म्हटले की, विराटच्या वाईट काळात त्याच्यावर टीका करणाऱ्या सर्वांचे तोंडे त्याने या खेळीनंतर बंद केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याला जास्त वेळ शांत ठेवणे म्हणजे…’, वाचा विराटविषयी ब्रेट ली काय म्हणाला
विराटची ऑस्ट्रेलियात विक्रमांची माळ! ‘हा’ पराक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार