भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना रद्द करावा लागला. त्यामुळे भारतीय संघाचा तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 0-1 असा पराभव झाला. भारताचा या मालिकेत पराभव जरी झालेला असला तरी भारताच्या काही खेळाडूंनी मात्र चांगले प्रदर्शन केले. भारताय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांंनी फलंदाजीत आणि उमरान मलिक याने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले.
या मालिकेत पाऊसामुळे दोन सामने रद्द करण्यात आले. मात्र, या मालिकेेत भारताच्या शुबमन गिल (Shubman Gill), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि उमरान मलिक (Umran Malik) या युवा खेळाडूंनी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर चांगलीच छाप टाकली. तिसरा सामना संपल्यावर शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की, या एकदिवसीय मालिकेतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी समोर आल्या. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) धावा करतोय, तो कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर संयमाने टीकून राहू शकतो. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे क्षमता आणि गुणवत्तेची काहीही कमी नाहीये.”
ते पुढे म्हणालेे की, “माझ्यामते वॉशिंग्टन सुंदर खूप चांगला खेळाडू आहे. उमरान मलिक याने ज्यापद्धतीने गोलंदाजी केली ती मला आवडली. शुबमन गिल डावाच्या सुरुवातीला सकारात्मक होता. ही परिस्थिती कठीण आहेे, तुम्हाला अशी परिस्थिती नेहमी बघायला मिळणार नाही आणि तुम्ही नेहमी न्यूझीलंडचा दौरा नाही करत.”
न्यूझीलंड विरुद्ध खेललेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने भारतीय फंलदाज श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला. मालिकेत अर्धशतक झळकावल्याने अय्यरला 27व्या स्थानी तर गिल 34व्या स्थानी पोहोचला.मात्र, भारतीय संघाला दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने ही मालिका 0-1ने गमवावी लागली.(Ravi Shastri admired the young players of Indian Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनला वाट पाहावी लागणार! धवनने सांगितले पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये का मिळते प्राधान्य
कर्णधार धवनसह ‘हे’ सात खेळाडू भारतात परतलेच नाही, ‘असा’ आहे संघाचा पुढचा प्लॅन