भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२मधील त्याचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्रींच्या मते विराटने काही काळासाठी विश्रांती घेतली पाहिजे आणि चालू आयपीएल हंगामातून माघार घेणे त्याच्यासाठी उत्तम राहील.
रवी शास्त्री (Ravi Shastri) जतीन सप्रूच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाले की, “मला वाटते की, विश्रांती घेणे त्याच्यासाठी उत्तम असेल. कारण त्याने विश्रांती न घेता विक्रेट खेळले आहे. त्याने सर्व प्रकारांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्यासाठी विश्रांती घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्हाला माहिती आहे की, कधी कधी संतुलन बनवावे लागते. तुम्हाला तुमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी बनवायची असेल आणि पुढचे ६-७ वर्ष स्वतःची छाप सोडायची असेल, तर आयपीएमधून माघार घ्यावी.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शास्त्रींनी हा सल्ला केवळ विराटच नाही, तर अशा खराब फॉर्ममधून जाणाऱ्या इतर खेळाडूंनाही दिला आहे. शास्त्री म्हणाले की, “तुम्ही १४-१५ वर्षांपासून खेळत आला आहात. विराटच नाही, मी एखाद्या इतर खेळाडूलाही हेच सांगेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून खेळत असाल आणि भारतासाठी चांगले प्रदर्शन करायचे आहे, तर ही रेषा ओढावी लागेल, जिथे तुम्हाला ही विश्रांती घ्यावी लागेल. उत्तम विश्रांती ही ऑफ सिजन असेल, जेव्हा भारतीय संघ खेळत नसेल.”
“भारत केवळ आयपीएल खेळत नाहीये. कधी-कधी, तुम्ही असे करणे गरजेचे असते किंवा फ्रँचायझीला सांगावे लागते की, मी केवळ अर्धा हंगाम खेळेल. मला अर्धाच मोबदला द्या. जर तुम्हाला एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपात शिखरावर पोहोचायचे असेल, तर हा कठीण निर्णय घेणे गरजेचे आहे,” असेही शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान विराटचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये १६च्या सरासरीने १२८ धावा केल्या आहेत. असे असले, तरीही विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत ५ शतके आणि ४२ अर्धशतके केली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या माजी कर्णधाराची भविष्यवाणी; सांगितली आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या ‘या’ ४ संघांची नावे
चहलने सुधारली चूक! कार्तिकला रनआऊट करण्यात फुटला घाम, आधी चेंडू निसटला; मग घडलं असं काही
‘मला त्यांचा प्लॅन आधीच माहित होता’, सीएसकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या धवनचा खुलासा