---Advertisement---

टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री भारतीय संघाला करणार राम राम; संघात होऊ शकतात मोठे बदल

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 9:25 PM
Ravi Shastri
---Advertisement---

येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे. याचे श्रेय खेळाडूंना जातेच परंतु, त्यापेक्षाही अधिक श्रेय या खेळाडूंचा सराव करून घेणाऱ्या प्रशिक्षकांना जाते. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जेव्हापासून संघाचा कारभार हाती घेतला आहे, तेव्हापासून भारतीय संघाने अनेक मोठ मोठ्या स्पर्धेत आणि मालिकेत विजय मिळवला आहे. परंतु, टी -२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर हे संघापासून वेगळे होऊ शकतात.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयला देखील नवीन प्रशिक्षक हवे आहेत. रवी शास्त्री यांनी सुरवातीला २०१४-२०१६ दरम्यान संघ निर्देशकाची भूमिका बजावली होती. त्यानंतर एक वर्ष अनिल कुंबळे यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. परंतु, २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर, रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली होती. त्यांचा कालावधी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर संपणार आहे.

तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सध्याच्या भारतीय गोलंदाजांना विश्वस्तरिय गोलंदाज बनवण्यात मोलाचे योगदान दिले. तर आर श्रीधर यांनी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाच्या पाया मजबूत करून घेतला.तसेच रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि २०२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. परंतु, त्यांना आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकून देता आली नाही.(Ravi Shastri, bharat arun, r Shridhar and Vikram rathour look at exit route after T20 world cup)

परंतु, बीसीसीआय काही महत्वाचे बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,टी -२० विश्वचषक स्पर्धेनंतर नवीन प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. यामध्ये राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच राहुल द्रविड हे नॅशनल क्रिकेट ॲकेडमीचे प्रमुख होते. त्यांचा कालावधी देखील आता संपला आहे. जर त्यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज केला नाही ,तर ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात.

जुलै महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवला तर टी-२० मालिकेत २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

रविंद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी पाहून सेहवाग भलताच खुश; म्हणाला, ‘मला अजूनही आठवतय…’

“भारत सहजरित्या मालिका खिशात घालेल”, दिग्गज गोलंदाजाने टाकले टीम इंडियाच्या पारड्यात वजन

‘क्रिकेटच्या पंढरी’त भलेभले दिग्गज ठरलेत अपयशी; सध्याच्या टीम इंडियातील केवळ ‘या’ फलंदाजाने केलंय शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---