भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती अशी की काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आता पूर्णपणे बरा झाला असून तो संघात परत आला आहे. 22 जुलै रोजी पंत भारतीय संघात परत आल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत झाले. अगदी हार घालून पंतचे संघात स्वागत करण्यात आले होते.
प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंत संघात परत आला असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सर्वांना सांगितले. हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे. शास्त्री यांनी पंतबरोबरचा एक फोटो शेअर करत ट्विट केले की ‘कोविड रिटर्न परत घरी आला आहे. मस्त, आता ड्रेसिंगरुममधील आवाज वाढला आहे.’
शास्त्रींनी केलेल्या या ट्विटला ट्विटरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ‘कोविड परत आला आहे’, असा अर्थ निघत असल्याचे ट्विटरकर्त्यांनी दर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या ट्विटवर अनेम मजेशीर प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
Covid return back !?!?! 😳😳 I think you're drunk 😂😂😁
— Rinkuist (@randomfreako) July 22, 2021
Actually his name is pant and not covid.
I think you are in high. Please tweet when you are normal.— Karthi Kn (@karthikn_30) July 22, 2021
Bhai comma daal dete Covid wale sentence me🥲
— praths (@lmaopraths) July 22, 2021
I can always hear your tweets.😅
Anyone else who reads Ravi sir's tweet in his majestic voice?😝— anubhav🇮🇳 (@Anubhav_Itis) July 22, 2021
Yeh hein Royal stag ka kamal!!!
— Sagar (@Sagar87250277) July 22, 2021
Shastriji, Pant is not that bad a cricketer to be called a COVID 🤣.
— Hritik S Nair (@h_nair_97) July 23, 2021
I think pant goes on confused state after corona arrived🤣🤣🤣🤣
— 𝓕𝓾𝔃𝔃𝓲𝓮_𝓢𝔀𝓮𝓮𝓽𝔂 (@Vibhushana5) July 22, 2021
' covid return back' phir saste nashe kiye ho ka…….?
— 𝕯𝖍𝖆𝖓𝖗𝖆𝖏 𝕯𝖚𝖇𝖊𝖞 (@imDhanraj_) July 23, 2021
Covid return back in the house 😂🔥 Ravi Sir OP 😂
— YUVRAJSINH RAULJI (@yuvrajsinh_0611) July 22, 2021
Ye kaisa caption hai????🙄🙄🙄
— Harsh Prakash Singh (@singharsh01) July 22, 2021
पंत गेल्या काही काळापासून चांगला फॉर्ममध्ये असून इंग्लंड दौर्यावर भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे म्हटले जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना 23 जून रोजी संपला होता, त्यानंतर भारतीय संघाला 20 दिवसांचा ब्रेक दिला गेला होता. या ब्रेकदरम्यान पंत कोविड-19 चाचणीत सकारात्मक आढळला होता. त्यामुळे त्याला क्वारंटाईन व्हावे लागले होते. तसेत त्याला सराव सामन्यातही सहभागी होता आले नाही.
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू 15-16 जुलै रोजी डरहॅममध्ये एकत्र आले होते. क्वारंटाईनचा काळ पूर्ण झाल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आल्यानंतर पंतने बायो बबलमध्ये संघाबरोबर सराव सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तेव्हा शोएब अख्तर अनुष्काला म्हणाला होता, ‘विराट कर्णधार बनून मोठी चूक करत आहे’
विराटचा ‘तो’ फोटो शेअर करत २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातील आठवणींना उजाळा; दिले मन जिंकणारे कॅप्शन
पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा आनंद, कृष्णप्पा गौतमचा ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल