भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री सातत्याने सोशल मिडीयावर चर्चेत असतात. भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना त्यांच्यावर अनेक मीम्स सोशल मीडियावर धुमाकुळ घालायचे. मात्र, आता सध्या रवि शास्त्री त्यांच्या एका ट्विटमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या ट्विटमधून आपण अनेक वर्षांनंतर भावुक झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रवी शास्त्री यांनी नुकतेच ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांना बक्षिस मिळालेल्या ऑडी १००सोबतचे फोटो आहेत. ही ऑडी ३७ वर्षांनंतर शास्त्रींना परत मिळाली आहे. ही गाडी त्यांना बेन्सन आणि हेजेस कप १९८५ जिंकल्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी बक्षिस म्हणून मिळाली होती.
सुपर कार क्लब ऑफ इंडियाने ही मौल्यवान ऑडी कार रिस्टोर केली आहे. १९८५ मध्ये रवी शास्त्री यांना पहिल्यांदा कार मिळाली होती. आता ही कार त्याच लूकमध्ये परत आणण्यात आली होती. तब्बल ३७ वर्षांनंतर पूर्ववत झालेली ही कार पाहून माजी क्रिकेटपटू भावूक झाले,
गौतम सिंघानिया यांनी ही विंटेज ऑडी १०० कार रवी शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर रवि शास्त्रींनी या बाबत एक भावुक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी “ही गाडी म्हणजे देशाची मालमत्ता आहे” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
This is as nostalgic as it can get! This is a 🇮🇳 national asset. This is #TeamIndia’s @AudiIN – @SinghaniaGautam 🙏🏻 pic.twitter.com/fkVITwTXw1
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 3, 2022
दरम्यान, १९८३ साली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९८४-८५ भारताने बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली. रवी शास्त्रींनी या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती आणि त्यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत ७ संघ सहभागी झाले होते. निर्णायक सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने ही स्पर्धा जिंकली होती.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अगग! २२ वर्षीय गोलंदाजाच्या रणनितीपुढे अनुभवी विलियम्सनने टेकले गुडघे, स्टोक्सलाही हसू अनावर