इंडियन प्रीमियर लीग 2023 संपल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामन्याकडे सर्वाचे लक्ष असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारत आणि पॅट किमन्स कर्णधार असलेला ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यासाठी आमने सामने असतील. 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह या सामन्यात उतरतील. अशातच भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या दोन्ही संघांची मिळून एक प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. शास्त्रींनी आपल्या प्लेइंग इलेव्हनचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे न देता रोहित शर्माकडेच ठेवले आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघांतील लढत पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत. याच पार्श्वभूमीवर रवी शात्री (Ravi Shastri) यांनी दोन्ही संघांची मिळून एक प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. याचे कर्णधारपद भारताचा रोहित शर्मा करत आहे. संघात विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनाही निवडले गेले आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उस्मान ख्वाजा येतील.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी शास्त्रींनी ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला निवडले आहे, ज्याने कसोटी फॉरमॅटमध्ये मागच्या मोठ्या काळापासून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. चौथ्या क्रमांकवर भारतीय दिग्गज विराट कोहली फलंदाजीला येईल. शास्त्रींच्या मते विराटच्या साधीला पाचव्या क्रमांकावर स्टीव स्मिथ फलंदाजीला आला पाहिजे. शास्त्रींनी आपल्या संघात अष्टपैलू रविंद्र जेडलाला निवडले आहे, जो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. सातव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऍलेक्स कॅरी खेळेल.
वेगवान गोलंदाजी आक्रमाणात ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मोहम्मद शमी यांना शास्त्रींनी संघात घेतले आहे. फिरकीपटू म्हणून नेथन लियॉन याला निवडले आहे. शास्त्रींनी आपल्या संघात ऑस्ट्रलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर, भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संधी न दिल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
रवी शास्त्रींनी डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेली प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, विराट कोहली, स्टीव स्मिथ, रविंद्र जडेजा, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लियॉन, मोहम्मद शमी.
(Ravi Shastri has picked a joint playing XI for India and Australia in the wake of the WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील खराब कामगिरीने ‘या’ तिघांसाठी बंद झाली टीम इंडियाची दारे, पुनरागमन अशक्यच
‘लोकांना वाटतंय माझा टी20चा स्तर…’, सतत ट्रोल करणाऱ्यांना विराटने एकदाच दिले उत्तर