---Advertisement---

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार पाकिस्तान? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2025 8:02 PM
---Advertisement---

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाणार आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघ (19 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने असतील. तत्पूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा असा विश्वास आहे की, धोकादायक वेगवान गोलंदाजी आक्रमण आणि घरच्या परिस्थितीत खेळल्याने, यजमान पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो.

गतविजेत्या पाकिस्तानने अलीकडेच दक्षिण आफ्रिका (South Africa), झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सलग 3 वनडे मालिका जिंकल्या आहेत. आयसीसीच्या पुनरावलोकनात रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले, “माझा असा विश्वास आहे की पाकिस्तान हा असा संघ आहे, ज्याने गेल्या 6 ते 8 महिन्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अपवादात्मक कामगिरी केली आहे, विशेषतः दक्षिण आफ्रिकेतील त्यांची कामगिरी उत्कृष्ट होती.”

पुढे बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “त्यांना सॅम अयुबची उणीव भासेल कारण तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे पण पाकिस्तान संघ घरच्या परिस्थितीत धोकादायक आहे. मला वाटतं की तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला पाहिजे. यानंतर कोणताही संघ जिंकू शकतो.”

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तान संघ- मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी

महत्त्वाच्या बातम्या-

संघाला दुहेरी धक्का! चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडला ‘हा’ स्टार खेळाडू
रणजीतील दमदार कामगिरीनंतर शार्दुल ठाकूरचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समावेश होणार?
तिरंगी मालिकेत किवींचे वर्चस्व! दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरी गाठली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---