भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया देताना, भारतीय खेळाडूंना विदेशातील लीग न खेळण्याचा तोटा होत असल्याचे म्हटले होते. याच मुद्द्यावर अनेक दिग्गजांमध्ये मतभेद देखील दिसून आले. त्याचवेळी आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंना विदेशातील लीग खेळण्याची काही गरज नसल्याचे म्हटले.
टी20 विश्वचषकात पराभव झाल्यानंतर राहुल यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडूंना विदेशात लीग खेळण्याचा अनुभव नसल्याचा मुद्दा उपस्थित केलेला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत विचार करावा असे म्हटले. याबाबत अनेक माजी भारतीय खेळाडूंनी देखील त्याला पाठिंबा दिलेला.
आता भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी द्रविड यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. शास्त्री म्हणाले,
“भारताची क्रिकेट प्रणाली आधीपासूनच खूप सक्षम आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूंनी विदेशात खेळावे याची मला काही गरज वाटत नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंना पुरेशी संधी देखील मिळते. आपले युवा संघ विविध देशांच्या दौऱ्यावर देखील जातात. आपल्याकडे जगातील सर्वात भव्य लीग आहे. केवळ आपल्या खेळाडूंना गरज पडल्यास त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील यायला हवे.”
सध्या बीसीसीआय कोणत्याच भारतीय खेळाडूंना विदेशी टी20 लीग खेळण्याची परवानगी देत नाही. भारतीय खेळाडूंना परदेशात खेळायचे असल्यास त्यांना थेट निवृत्ती घ्यावी लागते. मागील दोन वर्षात अनेक युवा भारतीय खेळाडूंनी निवृत्ती घेत अमेरिकेचा रस्ता धरला आहे.
(Ravi Shastri On Indian Players In Foreign T20 League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच
आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?