---Advertisement---

क्रीझ सोडणाऱ्या फलंदाजाला बाद करणे बॉलर्सचा हक्कच! माजी हेडकोचचे मोठे विधान

Deepti-Sharma
---Advertisement---

भारताच्या दीप्ति शर्मा हीने इंग्लंडच्या चार्लोट डीन ला बाद केले तेव्हापासून क्रिकेटविश्वात मंकडींग हा शब्द पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पुरूष क्रिकेट संघात टी20 मालिका खेळली गेली. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जोस बटलर याला “मी दीप्ती नाही” असे म्हणत लवकर क्रीज न सोडण्याचा इशारा दिला होता. यामुळे स्टार्कच्या विधानावर आणि दीप्तिच्या मंकडींगवर काही खेळाडूंनी आपापली मते व्यक्त केली आहेत. यावर भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने आपले मत सांगताना म्हटले, जर एखादा फलंदाज लवकरच क्रीझ सोडत असले तर गोलंदाजांना त्याला बाद करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

मंकडींगवर बेन स्टोक्स (Ben Stokes), रविचंद्रन अश्विन, ऍरॉन फिंच आणि जोस बटलर यांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यातच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही मंकडींगवर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “हा एक नियम असून ज्यामध्ये फलंदाजाला चेंडू टाकण्याआधी क्रीझ सोडण्याचा काही लाभ होत नाही. क्रिकेटच्या नियमानुसार जर एखाद्या फलंदाजांने असे केले तर गोलंदाजाला स्टम्प उडवण्याचा/ बाद करण्याच पूर्ण हक्क आहे. मंकड किंवा मंकडींग हा नियम मला माहित असून तो खूप काळापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे खेळाडू त्याचा योग्य वापर करण्याचा आजही प्रयत्न करत आहेत. एका प्रशिक्षकाच्या रूपात मी तर खेळाडूंना म्हणेल ‘जा आणि आउट करून या. हा एक नियम असून तुम्ही कोणताही धोका नाही देत आहात’. फलंदाजाला आपले कर्तव्य माहित असले पाहिजे.”

https://twitter.com/SonySportsNetwk/status/1573877451704266754?s=20&t=JurEMQl48qte6lL9GwdeKw

हे विचार शास्त्री यांनी फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना व्यक्त केले आहेत. “आधी हा नियम नव्हता याचे मला दु:ख आहे, मात्र तो अप्रत्यक्षरित्या होता. माझ्यामते, एखाद्या खेळाडूला आधी चेतावणी द्यावी आणि दुसऱ्यांदा बाद करणे याचा अर्थ असा की मी एका क्षेत्ररक्षकाला म्हणेल की तुम्ही एक झेल सोडला असून दुसरा झेल पकडू शकता. हे मला मान्य नसून तो धोका आहे. त्यातच फलंदाजांनेही क्रीझ सोडणे योग्य नाही, असेही शास्त्री यांनी पुढे म्हटले आहे.

आयसीसीने एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामध्ये मंकडींगला धावबाद असा करार दिला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताला कुणाचीही ऐकण्याची गरज नाही’, क्रीडा मंत्र्यांचे पाकिस्तानच्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर
श्रीलंकेची सुपर 12मध्ये धमाकेदार एंट्री, पराभूत होऊनसुद्धा नेदरलॅंड्सच्या पुढच्या फेरीच्या आशा कायम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---