भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) यांनी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर (indian selectors) प्रश्न उपस्थित केला आहे. शास्त्रींनी २०१९ विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघाच्या बाबतील त्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघात एकसोबतच तीन यष्टीरक्षकांना संधी दिली गेली होती, शास्त्रींच्या मते निवडर्त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य नव्हता. अंबाती रायुडूला या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नव्हती, शास्त्रींनी यासंदर्भात देखील मोठे व्यक्तव्य केले आहे.
२०१९ विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघाविषयी (indian cricket team) खूप चर्चा झाली होती. अंबाती रायुडूला या संघात निवडले गेले नव्हते आणि त्यामुळे अनेकांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते. तत्पूर्वी, रायुडू संघात चौथ्या क्रमांकाचा दावेदार होता. मात्र, जेव्हा विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा मात्र त्याचे नाव संघात नव्हते. त्याच्या जागी विजय शंकरला संघात समील केले गेलेले. रवी शास्त्रींना जेव्हा याबाबतील प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की, संघात एकतर रायडू किंवा श्रेयस अय्यर निवडला गेला पाहिजे होता. ते पुढे म्हणाले की, तीन यष्टीरक्षक निवडण्याला काहीच अर्थ नव्हता.
रवी शास्त्रींनी एका प्रमुख वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, “मी संघाच्या निवडीविषयी काहीच बोलत नाही. मात्र, विश्वचषकासाठी तीन यष्टीरक्षकांना निवडल्यामुळे मी खुश नव्हतो. एकतर रायुडूला किंवा श्रेयस अय्यरला सामील केले पाहिजे होते. एमएस धोनी, पंत आणि कार्तिकला एकत्र निवडण्यात काय अर्थ होता. तरी मी निवडकर्त्यांच्या कामात दखल देत नाही. जोपर्यंत मला विचारले जात नाही, तोपर्यंत मी माझे मत मांडत नाही.”
दरम्यान, २०१९ विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण, उपांत्य सामन्यात संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि भारताचे विश्वचषचक जिंकण्याचे स्वप्न त्याच ठिकाणी तुटले होते.
महत्वाच्या बातम्या –
हरभजनने जागविल्या जुन्या आठवणी! तुम्ही ओळखू शकता का त्याचे ‘हे’ दोन सहकारी?
विक्रमवीर रूट!! गॅबा कसोटीत अर्धशतकी खेळी करत माजी इंग्लिश कर्णधारासह पाँटिंगला पछाडले