---Advertisement---

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शास्त्री काय करणार? ऐका त्यांच्याच तोंडून

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 12:29 AM
ravi-shashtri
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान, हा कार्यकाळ संपल्यानंतर ते भविष्यात काय करणार आहेत? याचा त्यांनी खुलासा केला आहे.

रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक मोठमोठ्या मालिकेत विजय मिळवला. तसेच ऑस्ट्रेलियाला दोन वेळेस ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभूत केले आहे. यासह भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. परंतु त्यांचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबर महिन्यात समाप्त होणार आहे.

त्यांनी नुकताच दिलेल्या एक मुलाखतीत म्हटले की, “मी तर येणाऱ्या ४५ दिवसांची वाट पाहतोय. यापेक्षा आणखी मी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीये. मला त्यावरच लक्ष केंद्रित करूद्या आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळेलच की शास्त्रीजी काय करणार आहेत?”

कसे आहे रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांचे नाते?
या मुलाखती दरम्यान रवी शास्त्री यांनी सौरव गांगुलीसोबत घडलेला एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की, “जर कोणी बसमध्ये येताना उशीर करत असे तर, बस कोणासाठीही थांबणार नसे. मग तो कोणी ही असो.”

ही घटना २००७ मध्ये घडली होती. त्यावेळी सौरव गांगुलीला येण्यास उशीर झाला होता. मग रवी शास्त्री यांनी सौरव गांगुलीला बसमध्ये चढण्याची अनुमती दिली नव्हती. परंतु आता सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षक आहेत. तरीदेखील त्यांचे आपसातील संबंध चांगले आहेत.(Ravi Shastri opens up what next for him after end of team India coaching)

तसेच ते पुढे म्हणाले की, “ते (सौरव गांगुली) आता जेव्हा इंग्लंडमध्ये आले होते तेव्हादेखील मी त्यांच्यासोबत संवाद साधला होता. मी त्यांना खूप क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. खरं सांगायचं झालं तर आम्ही एकाच संघात खेळलो आहे. मी टाटा स्टील संघाचा कर्णधार होतो. तो माझ्या नेतृत्त्वाखाली खेळला आहे. आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो. माध्यमांना अशा गोष्टींमध्ये खूप रस असतो. ते या गोष्टींना आणखी वाढवून सांगत असतात.”

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ पलटवार करण्यास सज्ज, इंग्लंडच्या गोलंदाजांचे सगळे नुसके फेल ठरवण्यासाठी मिळालाय ‘हा’ कानमंत्र

अष्टपैलू जडेजा पूर्णपणे फिट, मग अश्विन परत बाकावर? गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली प्रतिक्रिया

‘भारत एक अद्भुत ठिकाण, तिथे क्रिकेटरला ​एखाद्या सिताऱ्यासारखी वागणूक मिळते’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---