आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया चषक खेळला जाणार असून सर्व संघ याची तयारी करत आहेत. स्पर्धेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. मागच्या काही महिन्यांपासून संघात मोठे फेरबदल झाले आहेत. तर वरिष्ठ खेळाडू दुखापतीमुळे मैदानातून बाहेर आहेत. अशातच संघ निवडणे सोपे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज रवी शास्त्री यांनी आपला आशिया चषक व विश्वचषक संघ जाहीर केला असून, यामध्ये चौथ्या क्रमांकासाठी युवा फलंदाज तिलक वर्मा याला संधी दिली आहे.
विश्वचषक अवघ्या 50 दिवसांवर आलेला असतानाही भारतीय संघाची चौथ्या क्रमांकाची समस्या सुटलेली नाही. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव व संजू सॅमसन असे अनेक पर्याय या एका क्रमांकासाठी विचारात आहेत. मात्र, प्रसारण वाहिनीसाठी निवडलेल्या संघात शास्त्री यांनी तिलक वर्मा याला ही जागा दिली. त्याचा फॉर्म देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरी याचे कारण त्यांनी यासाठी दिले.
देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तिलक याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील टी20 मालिकेसाठी संधी मिळाली होती. पहिल्याच सामन्यात फलंदाजीला आल्यावर त्याने या संधीचे सोने केले. त्याने आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याची किमया केली होती. भारताने गमावलेल्या या सामन्यात 22 चेंडूचा सामना करत सर्वाधिक 39 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याला आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण करण्यात यश आले. त्याने 51 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात नाबाद 49 धावांची खेळी करत त्याने भारताच्या विजया योगदान दिले. चौथ्या सामन्यात नाबाद 7 तर अखेरच्या सामन्यात 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी त्याने केली.
(Ravi Shastri Picks Tilak Varma For ODI World Cup Number 4 Slot)
महत्वाच्या बातम्या –
“मुले मुलांविरुद्ध खेळताना दिग्गज वाटतात”, गावसकरांची टीम इंडियावर खोचक टीका
‘ब्लास्टर’ ब्रुकची वर्ल्डकप वारी हुकली! ‘या’ कारणाने निवडसमितीने दाखवला अविश्वास






