चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मंगळवारी (दि. 30 मे) रात्री जवळपास 2 वाजता अंतिम सामन्याचा निकाल लागला. या सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्स संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. एमएस धोनी याच्या नेतृत्वात पाचव्यांदा ही ट्रॉफी आपल्या नावे केली. त्याच्या या कामगिरीनंतर बोलताना भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक व दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी धोनीची स्तुती केली.
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीचे कौतुक करताना रवी शास्त्री म्हणाले,
“ज्यावेळी धोनी थांबेल त्यावेळी तो आपल्या मागे आयपीएलमध्ये एक मोठी परंपरा सोडून जाणार आहे. चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये त्याला थाला म्हटले जाते. झारखंडसारख्या भागातून येऊन दक्षिण भारतात इतकी लोकप्रियता मिळवणे, ही गोष्ट त्याची महानता सिद्ध करते. इतकी प्रसिद्धी कोणाला मिळणे, अशक्य गोष्ट आहे.
धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 10 वेळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच, 5 वेळा विजेतेपद पटकावण्यात संघाला यश आले. तसेच भारतीय संघाचा विचार केल्यास त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे व टी20 विश्वचषक आपल्या नावे केला आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद देखील पटकावले होते. भारतीय संघाला प्रथम जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी नेण्याचा मान देखील त्याला मिळतो.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, अखेरच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. सुरुवातीला 20 षटकात मिळालेले 215 धावांचे आव्हान पाऊस आल्यामुळे 15 षटकात 171 करण्यात आलेले. मात्र, सर्वच फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे चेन्नईने अखेरच्या चेंडूवर हे आव्हान पार केले.
(Ravi Shastri Praised MS Dhoni For His Contribution In IPL Sucess)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलपूर्वीच टीम इंडियाला घाबरला स्टीव्ह स्मिथ! म्हणाला, ‘जे भारतात झालं, तेच…’
आयपीएल फायनलनंतर कशी सरली मोहित शर्माची रात्र? जे काही म्हणाला, त्याने तुम्हीही व्हाल भावूक