नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने बॉर्डर-गावस्कर मालिकेबाबत मोठी भाकीत केले होते. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, ऑस्ट्रेलिया 3-1 ने मालिका जिंकेल. तर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही बॉर्डर-गावस्कर मालिकेबाबत भाकीत केले आहे. भारताचे माजी प्रशिक्षक यांनी वर्षाच्या शेवटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील विजेत्याचे भाकीत केले आहे.
भारतीय संघ सलग दोनदा ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. आता पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचवेळी भारताचे माजी दिग्गज खेळाडू रवी शास्त्री यांनीही बॉर्डर-गावसकर मालिकेतील विजेतेपदाचे भाकीत केले आणि यावेळी पुन्हा भारतीय संघ विजेता बनेल आणि मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक साधेल, अशी आशा व्यक्त केली.
आयसीसीशी बोलताना माजी भारतीय प्रशिक्षकाने हे भाकीत केले. “लक्षात ठेवा, गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केले आहे आणि ऑस्ट्रेलियाने जवळपास दशकभरात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया बदलाच्या भावनेने खेळेल असे ही तो म्हणाला.
यावेळी शास्त्री यांनी अंदाज वर्तवला आणि सांगितले की, “यावेळी भारताची फलंदाजी आणि ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्ये लढत होणार आहे. ही भारताची फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांविरुद्ध असेल आणि अर्थातच, भारतीय गोलंदाजी अशी काही असेल ज्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे.”
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “आम्ही ही मालिका सुरू होण्याची प्रतीक्षा करणार नाही. मला वाटते भारत यावेळी हॅटट्रिक करू शकतो. कारण संघात जसप्रीत बुमराह तंदुरुस्त आहे, मोहम्मद शमी तंदुरुस्त आहे, मोहम्मद सिराजही तंदुरुस्त आहे. तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू आहेत. भारताची बाजू मजबूत आहे
हेही वाचा-
ब्रेकिंग बातमी: मोर्ने मॉर्केलची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आश्चर्यकारक निर्णय, कसोटी सामन्यात चक्क प्रेक्षकांवरच घातली बंदी
अद्भूत! अप्रतिम!! अविश्वसनीय!!!, सीएसकेच्या खेळाडूनं घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल