टॉप बातम्या

‘हे अविश्वनसनीय आहे….’, आयकॉनिक ऑडी 100 पाहून रवी शास्त्री आठवणींमध्ये हरवले

मुंबईतील रेमंड ऑटो फेस्ट दरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्यांची जुनी कार ऑडी 100 पाहून खूप आनंदित झाले. यादरम्यान, शास्त्रींनी त्यांची जुनी गाडी चालवली आणि तिच्या बोनेटवर ऑटोग्राफ दिले. 1985 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत शास्त्री यांनी ही कार जिंकली होती. शास्त्रींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

रवी शास्त्रींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहले की, 25 वर्षांनंतर माझे बाळ. ऑटो फेस्टमध्ये ऑडी चालवताना खूप मजा आली. या अविश्वसनीय उपक्रमाबद्दल गौतम सिंघानिया यांचे आभार. खरं तर 40 वर्षांपूर्वी भारताने जिंकलेली ही ऑडी जशी आहे तशी आजही चमकत आहे. हे अविश्वसनीय आहे. 

1985 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेने भारतासाठी दुहेरी आनंद आणला. 1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून विश्वचषक विजेतेपद जिंकले. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात शास्त्री यांनी शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी खूप संस्मरणीय ठरला. सामन्यात शास्त्री यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे भारत सामना जिंकण्यात आणि जेतेपद मिळवण्यात यशस्वी झाला. शास्त्री यांना मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. कारण त्यांनी फलंदाजीने 185 धावा केल्या आणि आठ विकेट्सही घेतल्या.

पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शास्त्रींनी सामना जिंकणारी खेळी खेळली. त्यांनी 148 चेंडूत 63 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने 10 षटके गोलंदाजी करत एक विकेटही मिळवले. यानंतर शास्त्रींना बक्षीस म्हणून ऑडी 100 कार मिळाली.

हेही वाचा-

पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूची निवड ठरली इंग्लंडची डोकेदुखी, भारत दौऱ्यापूर्वी व्हिसा अडकला
भारतीय संघातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू गायब? टीम मॅनेजमेंटवर माजी क्रिकेटपटू संतापला
Kho Kho WC 2025: टीम इंडियाचा बॅक टू बॅक विजय, दुसऱ्या सामन्यात ब्राझीलला लोळवलं

Related Articles