भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले रवी शास्त्री सध्या विविध मुद्यांवर भाष्य करत आहेत. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे म्हणणे आहे की, भारतात क्रिकेट टिकून राहण्यासाठी आणि प्रसारासाठी आयपीएल आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा टिकून राहण्यास मदत होईल.
शास्त्री म्हटले की, ‘आयपीएलमधून मिळालेल्या पैशातून बीसीसीआय इतर स्पर्धांचे आयोजन करते, म्हणून देशातील क्रिकेट टिकवण्यासाठी ही स्पर्धा आवश्यक आहे. भारतातील रणजी करंडक स्पर्धा आणि इतर देशांतर्गत स्पर्धांना प्रेक्षक कमी असतात आणि या सामन्यांच्या आयोजनासाठी जितका पैसा खर्च होतो, तितकाही पैसा बीसीसीआयला परत मिळत नाही. म्हणून आयपीएल आवश्यक आहे.’
रवी शास्त्री पुढे म्हणाले की, ‘मला वाटतं की आयपीएल खूप महत्त्वाचं आहे. लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही. क्रिकेटचे इतर स्पर्धा जिवंत ठेवण्यासाठी आयपीएलमधून पैसा येतो. या स्पर्धा आयोजित कराव्या लागतात आणि त्यासाठी पैसा असावा लागतो. त्यानंतर वेगवेगळे क्रिकेट प्रकारातील सामने आयोजित करण्यासाठी पैसे दिले जातात. तळागाळातील आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी पैसे द्यावे लागतात, जेणेकरून खेळ टिकेल.’
विराटला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आराम देण्याबाबत माजी भारतीय प्रशिक्षक म्हणाले, ‘भारतीय संघ खूप सामने खेळत आहे. मला वाटते की प्रत्येक खेळाडूला ब्रेक घेता आला पाहिजे. फक्त विराटच नाही, तर संघातील प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी आराम दिला पाहिजे, कारण तेही माणसे आहेत.’
विराटच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर शास्त्री म्हणाले की, ‘हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. त्याच्यावर कोणीही दबाव आणला नव्हता. त्याला विश्रांतीची गरज होती आणि विश्रांतीनंतर तो दुप्पट ऊर्जा घेऊन परत येईल. गेल्या सहा महिन्यांपासून तो बायो बबलमध्ये होता. अशावेळी विश्रांतीची गरज असते.’
महत्त्वाच्या बातम्या –
‘कर्णधाराने प्रत्येकाची भूमिका सुनिश्चित करावी’, रोहितच्या नेतृत्त्वाबद्दल केएल राहुलची प्रतिक्रिया
जिथे तिथे आम्हीच! ऑस्ट्रेलियाला टी२० विश्वचषकाचा विजेता बनवण्यात ‘या’ २ भारतीयांचे बहुमूल्य सहकार्य
‘टी२० विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघाविरुद्धची मालिका न्यूझीलंडसाठी सोपी नसेल’