सोशल मिडिया आज एक असे माध्यम झाले आहे ज्यावर कुठलीही घटना घडली की लगेच चर्चेला उत येतो. तसेच कुठल्याही घटनेवरचे विनोद मिम्स व्हायरल होणे, ही तर नित्याचीच बाब झाली आहे. अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींवर देखील सातत्याने मिम्स व्हायरल होत असतात आणि त्या व्यक्तींना त्याचा थांगपत्ताही नसतो.
सोशल मिडीयावर पसरणाऱ्या या मिम्समध्ये कायमच आढळून येणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री. भारतीय क्रिकेट संघाला जेव्हा केव्हा पराभवाचा सामना करावा लागतो, त्या त्या वेळी सोशल मिडीयावर मिम्सच्या माध्यमातून शास्त्री यांना लक्ष्य केले जाते. मात्र कधी कधी विजयानंतरही शास्त्री चर्चेत असतात. आत्ताही काहीसे असेच झाले आहे.
शास्त्री यांनी स्वत:च शेअर केले मिम
त्याचे झाले असे की, भारतीय संघाने इंग्लंडला अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात १० गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. हा सामना अवघ्या दोन दिवसात निकाली ठरला. याच मुद्द्यावरून सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल होऊ लागले. ज्यातील काही मिम्समध्ये रवी शास्त्री यांचाही समावेश होता.
यातील एका मिममध्ये रवी शास्त्री यांचे छायाचित्र असून त्यावर “तुम्हाला काय वाटले, मी पाच दिवस ड्राय स्टेट मध्ये राहू शकेल?”, अशी कॅप्शन लिहिल्या गेली होती. हे मिम प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी देखील ट्विटरवर शेअर केले होते. हे ट्विट आता खुद्द रवी शास्त्री यांनीदेखील शेअर केले आहे. हे शेअर करताना ते म्हणाले, “ही गंमत मला आवडते आहे. या कठीण काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसून आणू शकल्याने समाधानी आहे.”
Love the banter ! Feels good to bring some smiles in these tough times 🙌🏻 https://t.co/mzPe5MtItj
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) February 27, 2021
यापूर्वीही व्हायरल झाले आहेत मिम्स
सोशल मिडीयावर रवी शास्त्री यांच्यावरील मिम्स व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा शास्त्री यांच्यावर टीका करणारे तर कधी गंमत करणारे मिम्स व्हायरल झाले आहेत. विशेषतः भारतीय संघाच्या पराभवानंतर तर त्यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक चाहते मिम्सचा आधार घेताना दिसून आले आहेत. मात्र शास्त्री यांनी यापूर्वीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. आणि आता तर त्यांनी आपण स्वतः याच आनंद घेत असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
मराठी भाषा गौरव दिन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन फलंदाज
ब्रेकिंग! लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
INDvsENG: कोविड-१९ चा वनडे मालिकेला फटका! पुणे नव्हे तर महाराष्ट्राबाहेर होणार आयोजन?