रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही त्यांची शेवटची स्पर्धा होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेचे जेतेपद मिळवता आले नाही. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. दरम्यान मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी एक भावूक ट्विट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रवी शास्त्री यांनी ट्विट करत म्हटले की, “आता सर्वकाही स्पष्ट आहे. या अद्भुत प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जोपर्यंत मला क्रिकेट पाहता येत आहे, तोपर्यंत मी या आठवणी जपत राहीन आणि भारतीय संघाला पाठिंबा देत राहीन.” या ट्विटमध्ये शास्त्रींनी भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनाही टॅग केले आहे.
रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून कारकीर्द
अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले होते. रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय संघाने २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये जाऊन देखील अप्रतिम कामगिरी केली.
रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये हीट
रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एकूण ४३ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये भारतीय संघाने २५ कसोटी सामन्यात विजय मिळवले. १३ सामन्यात पराभव झाला तर ५ सामने हे बरोबरीत सुटले होते. तसेच वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने एकूण ७९ सामने खेळले. ज्यापैकी ५३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन सामने बरोबरीत सुटले होते. तर एक सामना अनिर्णीत राहिला होता.
टी-२० क्रिकेट बद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाला ६८ सामन्यांपैकी ४४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच २ सामने बरोबरीत आणि १ सामना अनिर्णीत राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’- व्हिडिओ व्हायरल
‘टीम इंडिया तो डूबी सनम, न्यूजीलंड को भी ले डूबे…’ भारतामुळे ऑस्ट्रेलियाचा टी२० विश्वचषक पक्का!!
ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर झाल्यानंतर ‘तो’ बनला होता सुतार, अवघ्या ३ चेंडूंनी वाचवली संपूर्ण कारकीर्द