fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हा फिरकीपटू असणार विश्वचषकात टीम इंडियाची पहिली पसंत

ऑस्ट्रेलियन भुमीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यादांच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वचषकामध्ये भारतीय संघासाठी पहिली पंसत असेल असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

“भारतीय संघाला सध्या चायनामन गोलंदाजाची गरज आहे. यामुळे कुलदिपचा विश्वचषकासाठी भारताच्या अंतिम खेळाडूंच्या यादीत समावेश होऊ शकतो”, असे शास्त्री म्हणाले.

सिडनी कसोटीमध्ये कुलदिपने 99 धावा देत पाच विकेट्स घेतल्या होत्या. याआधी त्याने इंग्लंड दौऱ्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ठ खेळ केला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेणारा कुलदिप जगातील दुसराच डाव्या हाताचा फिरकीपटू(चायनामन गोलंदाज) ठरला. याआधी इंग्लंडचे फिरकीपटू जॉनी वॉर्डल यांनी 1955ला सिडनीमध्येच 79 धावा देत पाच विकेट्स पटकावल्या होत्या.

कुलदिपने ट्रेंट ब्रीजवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 24 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.

याचबरोबर कुलदिप आशिया खंडाबाहेर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला होता.

कुलदिपने 33 वन-डे सामन्यात 20.07च्या सरासरीने 67 विकेट्स घेतल्या आहेत. तर इंग्लंड विरुद्ध घेतलेल्या वन-डे सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स ही त्याची कारकिर्दीतील उत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माकडून बेबी सिटिंगसाठी रिषभ पंतला विचारणा

पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?

११५ धावा करूनही या खेळाडूचे हुकले शतक, जाणून घ्या कसे

You might also like