---Advertisement---

“विराटचे यश अनेकांना पचले नसते”

On: सोमवार, जानेवारी 24, 2022 6:33 PM
virat kohli
---Advertisement---

नुकतीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत  (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. ही मालिका होण्यापूर्वी ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत देखील भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका कर्णधार म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli)  शेवटची मालिका ठरली होती. ही मालिका झाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता रवी शास्त्री (Ravi Shastri statement)  यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर बोलताना म्हटले की, “तो आणखी २ वर्ष कसोटी संघाचे नेतृत्व करू शकला असता. कारण येणाऱ्या २ वर्षात भारतीय संघाला मायदेशात मालिका खेळायच्या आहेत. परंतु तेव्हा त्याच्या नावे ५०- ६० विजय मिळवल्याची नोंद झाली असते. हे अनेकांना पचले नसते.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “कोहली आणखी २ वर्ष संघाचे नेतृत्व करू शकला असता. परंतु आपण त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. कुठल्याही देशात त्याने केलेली कामगिरी ही अविश्वसनीय आहे. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत २-१ ने पराभूत झाले तरीदेखील चर्चा सुरू आहे की, त्याने संघाचे नेतृत्व केले पाहिजे की नाही.”

तसेच कसोटी संघाचा पुढील कर्णधार म्हणून रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला प्रबळ दावेदार सांगितले आहे. त्यांच्या मते रोहित शर्मा जर फिट राहिला तर तो कसोटी संघाचे नेतृत्व करू शकतो.  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ६८ सामने खेळले होते. ज्यामध्ये भारतीय संघाला ४० सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.

महत्वाच्या बातम्या :

Video: अर्धशतक ठोकल्यानंतर विराटने केले ‘डॅडी सेलिब्रेशन’, अनुष्कासह वामिकाच्या रिऍक्शनने जिंकली मने

“…म्हणून जेमिमा आणि शिखा विश्वचषक संघात नाहीत”; प्रशिक्षकांनी दिले स्पष्टीकरण

हे नक्की पाहा:

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---