आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात अत्यंत झालेली आहे. दिल्लीला स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाही. दिल्लीने खेळलेल्या पाचही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर व खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. मात्र, भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी संघाचे मेंटर सौरव गांगुली यांना धारेवर धरले आहे.
दिल्ली कॅपिटल्स या हंगामात नियमित कर्णधार रिषभ पंत याच्या अपघातानंतरच्या गंभीर दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सहभागी झाली. परंतु, वॉर्नर याच्यासारखा अनुभवी व आयपीएल विजेता कर्णधार संघाचे नशीब बदलू शकला नाही. दिल्लीला पहिल्याच सामन्यात लखनऊने पराभूत केले. त्यानंतर गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलेले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांना अखेरच्या चेंडूवर निसटता पराभव पत्करावा लागलेला. त्यानंतर आरसीबीने देखील त्यांना एकतर्फी मात दिली.
संघाच्या या खराब कामगिरीवर बोलताना शास्त्री म्हणाले,
“दिल्लीसाठी चिंता करणारी गोष्ट ही आहे की, इतर संघ वेगाने पुढे जात आहेत. तुम्ही सलग पाच सामने गमावल्यानंतर पुनरागमन करणे काहीसे अवघड असते. वॉर्नर असा खेळाडू आहे जो नेहमी विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्याला पराभव आवडत नाही. तुम्ही हरत असता मात्र तुम्ही खूपच एकतर्फी पराभूत होत आहात. त्यांनी कदाचित विजयाची आशा देखील सोडली आहे.”
दिल्लीचे मेंटर असलेल्या सौरव गांगुली यांच्याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले,
“गांगुली यांना वाटले असेल ही गोष्ट सोपी आहे. मात्र, असे नाही. तुम्हाला योग्य रणनीती आखावीच लागते.”
गांगुली 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेंटर होते. त्यानंतर तीन वर्ष ते बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. यावर्षी दिल्लीचे मेंटर व ऑपरेशन हेड अशा भूमिकेमध्ये त्यांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.
(Ravi Shastri Take Dig On Sourav Ganguly After Delhi Capitals Five Loss In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हायवोल्टेज’ सामन्यात राजस्थानने जिंकली नाणेफेक! गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण, अशा आहेत प्लेईंग इलेव्हन
“यशाचे क्रेडिट घेतो तशी पराभवाची जबाबदारी घे”, दिल्लीच्या पराभवानंतर पॉंटिंगवर दिग्गजाचे शरसंधान