जसप्रीत बुमराह नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज नबला. ताच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत त्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या विशाखापट्टण कसोटीत त्याने सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या. असे असले तरी, कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळआली नव्हती. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुमराहच्या कसोटी पदार्पणाविषयी किस्सा सांगितला आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 2016 मध्ये भारतीय संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण कसोटी पदार्पणासाठी त्याला 2018 पर्यंत वाट पाहावी लागली. त्याने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आप्रिकेविरुद्ध कॅप टाऊम कसोटीतून पदार्पण केले. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री होते. शास्त्रींनीच बुमराहला कसोटी पदार्पणाची संधी दिली होती. ही संधी देण्याआधी शास्त्रींनी मुद्दाम वेगवान गोलंदाजाला कसोटी क्रिकेटविषयी काय वाटते, हे जाणून घेतले. त्यावेळी बुमराहची इच्छा आणि उत्साह पाहण्यासारखा होता, असे शास्त्रींनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रवी शास्त्री यांना द टाइम्ससाठी इंग्लंडचे माजी कर्णदार मायकल एथर्टन यांच्यासोबत एक मुलाखत दिली. शास्त्रींनी यावेळी बुमराहच्या कसोटी पदार्पणाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “मझ्या लक्षात आहे की, कोलकाता मध्ये असताना मी त्याल पहिला फोन केला होता. मी त्याला विचारले की, कसोटी क्रिकेट आवडते का? त्याने लगेच सांगितले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असेल. याआधी त्याला न विचारताच व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये संधी दिली गेली होती. पण मला माहीत होते. मला पाहायचे होते की, त्याला किती आनंद होतोय.”
शास्त्री पुढे म्हणाले की, “मी त्याला म्हणालो, तयार राहा मी तुला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करायला लावणार आहे. विराट कोहलीसोबत कसोटी पदार्पण करण्यासाठी बुमराह खूपच उत्साहात होता. त्याला माहीत होते, दिवसाच्या शेवटची व्हाईट बॉल क्रिकेटमधील सरासरी कुणाच्याच लक्षात नसते. पण कसोटी क्रिकटेमणधील आकडे नेहमी चर्चेत राहणार आहेत.”
दरम्यान, बुमराहने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत 34 सामने खेळले आहेत. यामध्ये 20.19 च्या सरासरीने 155 विकेट्स नावावर केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराह खेळत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने खास विक्रम नावावर केला. बुमराह भारतासाठी सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 150 विकेट्स पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज बनला आहे. (Ravi Shastri tells the story of Jasprit Bumrah’s Test debut)
महत्वाच्या बातम्या –
U19 World Cup Final : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी भारत ऑस्ट्रेलिया अशी असेल प्लेइंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट
‘या’ खेळाडूंकडून अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या विशेष अपेक्षा? वाचा सविस्तर…