भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक व माजी दिग्गज खेळाडू रवी शास्त्री आज (२७ मे) आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रवी शास्त्री यांचे भारतीय क्रिकेटमध्ये एक मानाचे स्थान असून, त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. वाढदिवशी रवी शास्त्री सकाळपासूनच सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर, काहींनी या खास दिवशी देखील त्यांना ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छांच्या अशाच काही मजेदार सोशल मीडिया पोस्ट आपण पाहूयात.
एका ट्विटर वापरकर्त्याने रवी शास्त्री यांच्या वाढदिवशी त्यांच्या वाढदिवसाची पार्टी कशी असेल याबाबत एक मजेदार ट्विट केले आहे. एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील दृश्याचा मीम या चाहत्याने पोस्ट केला.
https://twitter.com/WhoKnowss13/status/1397796942583721984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1397796942583721984%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Ffans-didnt-spare-to-shastri-even-on-his-59th-birthday-thats-how-pulls-the-leg-funny-memes-got-virat-2450188
आणखी एका चाहत्या देखील अशाच आशयाचे ट्विट केले आहे.
https://twitter.com/BiswasDebanshi/status/1397790907601088512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1397790907601088512%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Ffans-didnt-spare-to-shastri-even-on-his-59th-birthday-thats-how-pulls-the-leg-funny-memes-got-virat-2450188
अन्य एका ट्विटमध्ये शास्त्री यांच्या एका महिला चाहत्याने त्यांच्या वाढदिवशी वेगळ्याच आनंदात शुभेच्छा दिल्या.
‘बियर बॉटल ते प्रशिक्षक म्हणून काही शानदार रेकॉर्ड वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा चिअर्स!’
Thank You for sending me your wishes on Diwali ~ legend Ravi Shastri#RaviShastri pic.twitter.com/WHj4cnmmxZ
— कटप्पा (@Katappa00) May 27, 2021
अजूनही प्रसिद्धीझोतात असतात शास्त्री
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कधी असते रवी शास्त्री नेहमी चर्चेत असतात. शास्त्रीय आपल्या बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते आपल्या याच स्वभावामुळे अडचणीत देखील आले आहेत.
अशी राहिली होती कारकीर्द
रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज अष्टपैलू मानले जाते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ८० कसोटीत ३८३० धावा व १५१ बळी मिळवले होते. तसेच, १५० वनडेत ३१०८ धावांसह १०९ बळी आपल्या नावे केले आहेत. रवी शास्त्री हे १९८३ क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे सदस्य राहिले होते. १९८५ मध्ये त्यांना वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स पुरस्काराने गौरविण्यात आलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी
भारताच्या अजून एका खेळाडूने घेतली कोरोनाची लस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार
विराटनंतर भारताचा भावी कर्णधार कोण? पाकिस्तानी दिग्गजाने रोहितसह घेतली ‘यांची’ नावे