---Advertisement---

‘बहुत मजा आयेगा आज!’ धोनी-पंतला आमने-सामने पाहण्यास टीम इंडियाचे गुरु सज्ज

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 6:07 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला शुक्रवारी (९ एप्रिल) रंगतदार सुरुवात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सवर दोन गड्यांनी मात करत विजयी सलामी दिली. त्यानंतर, आज (१० एप्रिल) दुसर्‍या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येतील. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विट करत चाहत्यांना या सामन्यात मजा येणार असल्याचे म्हटले आहे.

शास्त्री यांनी केले असे ट्विट
भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या हंगामातील दुसऱ्या सामन्यापूर्वी ट्विट करताना लिहिले, ‘गुरु विरुद्ध शिष्य. खूप मजा येणार आज. स्टंप माईक नक्की ऐका.’

शास्त्री यांनी अशा प्रकारचे ट्विट करण्यामागे कारण की, एमएस धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचे तर, रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. दोघेही यष्टिरक्षक असून, सामन्यादरम्यान ते सातत्याने काहीतरी मजेशीर बोलतात आणि ते स्टंप माईकद्वारे सर्वजण ऐकत असतात. युवा रिषभ हा धोनीला आपला आदर्श मानतो. आपण धोनीकडून बरेच काही शिकत असल्याची कबुली त्याने दिली होती.

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1380784761484976128

तोलामोलाची होणार लढत
हंगामातील दुसऱ्या सामन्यात तीन वेळचा आयपीएल विजेता संघ चेन्नई सुपर किंग्स व मागील वर्षीचा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येथील. चेन्नईचे नेतृत्व सर्वात अनुभवी एमएस धोनी तर, दिल्लीचे नेतृत्व युवा रिषभ पंत करेल. पंत प्रथमच आयपीएलमध्ये नेतृत्वाचा भार वाहताना दिसेल. हंगामापूर्वी नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने, त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

एकीकडे चेन्नईचा संघात धोनीसह सुरेश रैना, रवींद्र जडेजा, इम्रान ताहीर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डू प्लेसीस, शार्दुल ठाकुर यांसारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळताना दिसतील. मागील हंगाम गाजवणारे ऋतुराज गायकवाड व सॅम करन यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. तर, लिलावात कोट्यावधी रुपयांच्या बोलीसह संघात सामील झालेले. कृष्णप्पा गौतम व मोईन अलीहे पहिल्या सामन्यात छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.

दुसरीकडे, रिषभच्या दिमतीला अनुभवी शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस व अजिंक्य रहाणे यांच्यासोबत पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, ईशांत शर्मा व रविचंद्रन आश्विन असतील. दिल्लीसाठी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा व एन्रिक नॉर्किए हे विलगीकरणात असल्याने उपलब्ध असणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत ख्रिस वोक्स हा दिल्लीच्या वेगवान आक्रमणाची जबाबदारी सांभाळताना शकतो तर, अमित मिश्रा हा अश्विनच्या साथीने फिरकीची बाजू भक्कम करेल.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---