भारतीय क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे खूप जूने नाते आहे. गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट आणि बॉलिवूड यांच्या अफेयरची चर्चा रंग आहेत. बॉलीवूडमधील कलाकार क्रिकेटप्रेमी आहेत. ते क्रिकेटला फॉलो करतात. त्याचबरोबर अनेक भारतीय खेळाडूंचे बॉलीवुड मधल्या अभिनेत्रींसोबत नातेसंबंध देखील होते. भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर अनेक खेळाडू अभिनेत्रींच्या प्रेमात होते.
भारतीय संघात अनेक खेळाडूंचे या अभिनेत्रींसोबत नाते संबंध असल्याच्या बातम्या बाहेर येतात आणि त्यातील काही खेळाडूंनी अभिवेत्रींचा आपली अर्धांगिनी रुपात स्विकारला आहे. तर काहींचे नाते काही काळापर्यंतच टिकून राहिले. सध्या क्रिकेट आणि बॉलिवूडच्या अफेयरची चर्चा होणे आता साधारण बाब झाली आहे.
परंतु, तेच जर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे जर नाव समोर आले तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरंच आहे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही बॉलीवूडमधील अभिनेत्री सोबत नाव जोडले गेले होते.
वीस वर्षांनी लहान निमरत कौरबरोबरच्या नात्याची अफवा
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वय 59 वर्षे आहे. तर अभिनेत्री निमरत कौर चे 39 वर्षे आहे. या दोघांमध्ये नाते संबंध असण्याच्या अफवा काहीवर्षांपूर्वी पसरत होती. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निमरत कौर यांच्या मध्ये 20 वर्षाचा फरक आहे. साल 2018 मध्ये रवी शास्त्री आणि निमरत कौर यांच्या अफेयरच्या बातमीने सोशल मीडियावर धुमकुळ घातला होता. निमरत कौर यांनी ‘लंच बॉक्स’ आणि ‘एयरलिफ्ट’ या चित्रपटात तिने काम केले आहे.
रवी शास्त्री यांनी अफवेबद्दल दिली प्रतिक्रिया
रवी शास्त्रींनी 2018 मध्ये या बातमीचे पूर्णपणे खंडन केले होते. त्यांनी मिड डे सोबत बोलताना त्यांनी या बातमीबद्दल निराशा व्यक्त केली होती. त्यांनी यावर संताप ही व्यक्त केला. इतकेच नव्हे तर त्यांनी या बातमीला गायीचे शेण असे संबोधले.
शास्त्री म्हणाले की, “जेव्हा शेणाचे सर्वात मोठ्या ओझे असते, तेव्हा काहीच म्हणायचे नसते. मात्र, मी गायीचे शेण म्हणतोय, तर तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या –
शेवटी त्याने इंग्लंडला विश्वविजेते बनविलेच! कहाणी ‘बिग बेन’ ची
क्रीडाविश्वात खळबळ! भारताच्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप