इंडियन प्रीमियर लीग 2024साठी चाहत्यांच्या मनातील उत्सुकता मंगळवारी वाढली. पहिल्यांदाच बीसीसीआयने भारताबाहेर या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला. पॅट कमिन्स आणि त्याच्यानंतर मिचेल स्टार यांच्यावर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. नुकताच वनडे विश्वचषक जिंकणारा कर्णधार आयपीएल इतिहिसातील दुसरा सर्वात महागडा खेळाडूही बनला. अशातच भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची खास प्रतिक्रिया समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आयपीएल 2024साठी आपले नाव नोंदवले होते. आगामी आयपीएल हंगामात कमिन्सला संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने 20.50 कोटी रुपये खर्च केले. कमिन्स हैदराबादमध्ये सामील झाल्यानंतर तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण पुठच्या तासाभरातच मिचेल स्टार्क याने हा विक्रम मोडीत काढला. कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले आणि वेगवान गोलंदाज आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडूही ठरला.
कमिन्स आणि स्टार्कवर फ्रँचायझींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अनेकांच्या मते विदेशी खेळाडूंवर एवढा पैसा खर्च करणे योग्य नाही. पण भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री () यांच्या मते पॅट कमिन्सला मिळालेली रक्कम योग्य आहे. शास्त्रींनी अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली की, “पॅट कमिन्स तू भारी आहेस. यातील प्रत्येक रुपयासाठी तू लायक आहेस. मोठे सामने जिंकल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला किंमत मिळतेच. तुला सलाम.”
Patty Cummins. You beauty. You deserve every Penny put out there Champ. Win the Big ones you get International Respect. Take a Bow. 🍾🍾🍾 #iplauction2024 #IPL
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) December 19, 2023
दरम्यान, पॅट कमिन्ससाठी 2023 वर्ष एकप्रकारे क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरले आहे. यावर्षी त्याने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. विशेष म्हणजे या दोन्ही वेळी उपविजेतेपदावर समाधान भारतीय संघालाच मानावे लागले. वर्षातील पहिली आयसीसी ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या रुपात जिंकली. तसेच नुकताच पार पडलेला वनडे विश्वचषक ऑस्ट्रेलियानेच जिंकला. या दोन्ही विजेतेपदांसाठी कर्णधार पॅट कमिन्सचे योगदान महत्वाचे राहिले. सनरायझर्स हैदराबादाच्या संघ व्यवस्थापनाकडून संघाचे कर्णधारपद कमिन्सकडे सोपवले जाईल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. (Ravi Shastri’s statement on the amount received by Pat Cummins in the IPL 2024 auction )
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्राचा वाघ झाला लखपती! IPL 2024मध्ये खेळणार ‘या’ कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, लगेच वाचा
IPL Auction 2024 । पंजाबचा प्लॅन फसला! शाहरुख खान गुजरातच्या ताफ्यात