वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जात आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर उभा केला. यादरम्यान दुसऱ्या दिवशी भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने शतकी खेळी साकारली. त्याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी देखील महत्त्वपूर्ण अर्धशतके ठोकली. अश्विन याने या खेळीसह वेस्ट इंडीजविरुद्ध आपल्या फलंदाजीतील शानदार फॉर्मची पुन्हा एकदा झलक दाखवली.
दुसऱ्या दिवशी विराट कोहली आपल्या खात्यात आणखी 34 धावांची भर घालून तर ईशान किशन फलंदाजीला आल्यानंतर 25 धावा करत तंबूत परतला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या अश्विन याने आपल्यातील फलंदाजी कौशल्य पुन्हा एकदा दाखवले. त्याने 78 चेंडूंचा सामना करताना आठ चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. त्याच्या या खेळामुळे भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.
आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अश्विन याने वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजीतही नेहमीच शानदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आत्तापर्यंत 13 डाव खेळताना चार शतके व एक अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे पहिल्या डावात तो शून्यावर बाद झालेला. विशेष म्हणजे त्याची चारही आंतरराष्ट्रीय शतके ही वेस्ट इंडीजविरुद्ध झालेली आहेत.
अश्विन याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात बारा बळी मिळवताना भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. आता दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
(Ravichandran Ashwin Batting Great Against West Indies Hts 50 In Trinidad)
महत्त्वाच्या बातम्या-
‘जेव्हा मी क्रीझवर पाऊल ठेवले, ती वेळ…’, विक्रमी शतकानंतर काय म्हणाला विराट?
आधी गळाभेट, चुंबन आणि नंतर अश्रू! विराटला भेटताच विंडीजच्या खेळाडूची आई लागली रडू, भावूक करणारा Video