भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे सध्या मालिका बरोबरीत आहे. ऍडलेड येथे पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघाने मेलबर्न येथील सामन्यात दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. या विजयात भारताचा आघाडीचा फिरकी अश्विन महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आता प्रज्ञान ओझा म्हणाला, अश्विन भारतीय संघातील गोलंदाजांचा कर्णधार आहे.
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली.
ओझाच्या मतानुसार अश्विन आघाडीचा फिरकीपटू असल्याने त्याच्यामधे एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे मैदानावर त्याची देहबोली बदलते. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत अश्विनने आतापर्यंत संयुक्तपणे सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पॅट कमिन्स आणि अश्विन या दोघांनी प्रत्येकी 10 विकेट्स घेतल्या आहेत.
स्पोर्ट्स टुडे सोबत बोलताना प्रज्ञान ओझा म्हणाला, “अश्विनला माहित आहे, त्याला काय करायचे आहे. तो आता नवीन गोलंदाज राहिला नाही आणि त्याने अगोदर ही ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. आता त्याला संघात जागा बनवण्यासाठी खेळावे लागत नाही. हे कोणत्याही खेळाडूसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते. जेव्हा आपल्यामध्ये खराब कामगिरीच्या आधारावर संघातून वगळण्याची भीती नसते. तेव्हा आपली देहबोली बदलून जाते. आपल्याकडे ते स्वातंत्र्य असते आणि काही अतिरिक्त करू शकता. हेच कारण आहे की अश्विनमध्ये आता खूप बदल बघायला मिळत आहे. मैदानात सध्या तो गोलंदाजांचा कर्णधार आहे.”
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत अश्विनची दमदार कामगिरी
या मालिकेत आश्विनने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. उल्लेखनीय म्हणजे त्याने स्मिथ सारख्या दिग्गज फलंदाजाला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. स्टीव्ह स्मिथ आश्विन समोर फलंदाजी करताना अडखळत आहे. त्यामुळे त्याची बॅट या मालिकेत धावा करू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसर्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाची लागली आस
‘तो’ खेळाडू भारतासाठी पुढील दहा वर्षे खेळेल, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
त्यावेळी सिडनी कसोटीतील द्विशतकी खेळीदरम्यान सचिन तेंडुलकरने ऐकले होते ‘हे’ गाणे