---Advertisement---

विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 5:09 PM
R-Ashwin-and-Cheteshwar-Pujara
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवार (२५ नोव्हेंबर) पासून कसोटी मालिकेतील पहिला सामना ग्रीन पार्क स्टेडियवर खेळला गेला. हा सामना अखेरच्या दिवशी अनिर्णित ठरला. मात्र, भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या संपूर्ण सामन्यात चांगली गोलंदाजी करत महत्वाच्या विकेट्स घेतल्या. दरम्यान, त्याने सामन्याच्या शेवटच्या दिवशी एक खास विक्रम केला आहे.

अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या डावातही त्याने हे चांगले प्रदर्शन कायम ठेवले. दुसऱ्या डावात त्याने न्यूझीलंड संघाचे दोन्ही सलामीवीर टॉम लॅथम (५२) आणि विल यंग (२) यांचे विकेट्स घेतेले. अश्विनने विल यंगला सामन्याचा चौथा दिवस संपण्याच्या काही वेळापूर्वी बाद केले, तर टॉम लॉथमला शेवटच्या दिवशी ५५ व्या षटकात तंबूत पाठवले. शेवटच्या दिवशी टॉम लॅथमचा विकेट घेत अश्विनने स्वतःच्या नावावर एक नवीन विक्रमाची नोंद केली.

अश्विनने सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याची पहिला विकेट घेतल्यानंतर भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा विक्रम मोडीत काडला आहे. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकले आहे. हरभजन सिंगने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १०३ सामन्यांमध्ये एकूण ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. आता अश्विनने त्याच्या ८० कसोटी सामन्यांमध्ये ४१८ विकेट्स पूर्ण केल्या आहेत आणि हरभजनच्या पुढे गेला आहे.

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांचा विचार केला, तर अश्विन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर अनिल कुंबळे आहेत, ज्यांनी १३२ कसोटी सामन्यात ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव आहेत.  कपिल देव यांनी त्यांच्या १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अश्विनने स्थान बनवले आहे, तर हरभजन सिंग एक स्थानाने खाली घसरला आहे.

दरम्यान, सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंड संघाला विजयासाठी २८० धावांची आवश्यकता होती. तर भारताला ९ विकेट्सची गरज होती. पण, न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ९८ षटकांत ९ बाद १६५ धावांवर असताना सामना थांबवण्यात आला. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या डावात देखील अश्विनने ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

कानपूर कसोटीत अश्विनने मोडला हरभजनचा ‘महाविक्रम’, मातब्बर फिरकीपटूने असे काही करत जिंकली मने

धक्कादायक!! शेन वॉर्नचा मोठा अपघात, १५ मीटर पेक्षा लांब घासत गेली बाईक; मुलगाही होता सोबत

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ ‘या’ खेळाडूंना करणार रिटेन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---