---Advertisement---

“नॅथन लॉयनपेक्षा अश्विनकडे ८०० बळी घेण्याची क्षमता अधिक”, माजी महान फिरकीपटूने मांडले मत

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 4:08 PM
---Advertisement---

श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजेच ८०० बळी घेण्याचा विक्रम आहे. अनेकदा हा विक्रम कोण मोडू शकतं, यावर चर्चा होत असते. सध्याच्या काळातील दोन आघाडीचे ऑफस्पिनर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा नॅथन लाॅयन आणि भारताचा आर अश्विन यांच्यात हा विक्रम मोडण्याची क्षमता असल्याचेही अनेकांना वाटते. मात्र आता खुद्द मुरलीधरनने याबाबत त्याचे मत मांडले आहे.

मुरलीधरनच्या मते त्याचा ८०० बळींचा विक्रम मोडण्याची क्षमता अश्विनमध्ये असून लाॅयनला हा टप्पा गाठणे कठीण असल्याचे त्याने सांगितले आहे. यामागचे कारणही त्याने स्पष्ट केले. मुरलीधरनने लंडनच्या ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील एका स्तंभात हे मत मांडले आहे.

“अश्विनमध्ये क्षमता अधिक”

मुरलीधरन म्हणाला, “अश्विनकडे ८०० बळीचा टप्पा गाठण्याची खूप उत्तम संधी आहे. तो अतिशय दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी गोलंदाज ८०० बळींपर्यंत पोहोचेन, असे मला वाटत नाही. नॅथन लाॅयनबाबत देखील चर्चा होते, मात्र त्याच्यात एवढी क्षमता नाही. तो आत्ताही ४०० बळींच्या टप्प्याच्या जवळ आहे, मात्र तिथपर्यंत पोहोचायला त्याने खूप जास्त सामने खेळले आहेत.” नॅथन लाॅयनने आत्तापर्यंत ९९ सामन्यांमध्ये ३९६ बळी घेतले असून आर अश्विनने ७४ सामन्यांमध्ये ३७७ बळी घेतले आहेत.

मुरलीधरनने यावेळी क्रिकेटच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल आणि नियमांबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. “ज्यावेळी आम्ही खेळत होतो, तेव्हा खेळपट्टी अधिक सपाट असे आणि फलंदाज भक्कम बचावाने खेळणे, पसंत करत असत. त्यामुळे बळी मिळवणे ही कठीण गोष्ट होती. मात्र आता टी-२० आणि वनडे क्रिकेटमुळे खेळ वेगवान झाला असून कसोटी सामने तर चक्क तीन दिवसातच संपत आहेत. यामुळे गोलंदाजांना केवळ अचूक दिशा आणि टप्पा पकडून गोलंदाजी करूनही सहजपणे बळी मिळत आहेत”, असे तो म्हणाला.

मुरलीधरने डीआरएसबाबतही मतप्रदर्शन केले. तो म्हणाला, “डीआरएसमुळे नक्कीच गोलंदाजांचा फायदा झाला आहे. माझ्यावेळी डीआरएसचा वापर झाला असता तर माझ्या बळींची संख्या नक्कीच वाढली असती. कारण आमच्या काळी फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना करताना बॅटपेक्षा पॅडचा वापर अधिक करायचे आणि त्यामुळे त्यांना संशयाचा फायदा मिळत असे.”

महत्वाच्या बातम्या:

अन् डिलिव्हरीने थेट बोल्ड, खास कार्टून प्रसिद्ध करत अमूलकडून विरूष्काला शुभेच्छा; पाहा फोटो 

हॉटेलच्या खोलीत येताच तो रडू लागला, आर अश्विनच्या पत्नीचा मोठा खुलासा

AUS v IND : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---