भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन याच्या फिरकीच्या जाळ्यात आतापर्यंत जगभारातील अनेक महान फलंदाज अडकले आहेत. झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज सिकंदर रजा यावर्षी पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख बनवल्यानंतर सिंकदरला आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे. पण हंगामातील दुसऱ्या सामन्यात अनुभवी अश्विनने एक जबरदस्त चेंडू टाकत त्याला त्रिफळाचीत केले.
आयपीएलच्या मैदानात बुधवारी (6 एप्रिल) पंजाब किंग्ज आणि राजस्था रॉयल्स (RR vs PBKS) संघ आमने सामने होते. हंगामातील हा आठवा सामना होता, ज्यामध्ये पंजाबने 5 धावांनी राजस्थानचा पराभव केला. राजस्थान रॉयल्ससाठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin ) सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. अश्विनने 4 षटके गोलंदाजी केली आणि 25 धावा खर्च करून 1 महत्वापूर्ण विकेट घेतली. आपला दुसरा आयपीएल सामना खेळणारा सिकंदर रजा 2 चेंडूत 1 धाव करून तंबूत परतला. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या पंजाबने 4 बाद 197 धावा केल्या. पण प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघ 7 बाद 192 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
पंजाबच्या डावातील 17 व्या षटकात अश्विन गोलंदाजीला आला. षटकातील पहिलाच चेंडू त्याने जबरदस्त कॅरम बॉल टाकला, जो थेट स्टंप्समध्ये घुसला. सिकंदर मोठा शॉट खेळण्यासाठी पुढे आला होता, पण चेंडूचा अंदाज न लागल्यामुळे त्याला खेळपट्टीवर खाली बसण्याची वेळ आली. चेंडू बॅटच्या अगदी जवळून गेला आणि स्टंप्सला लागला. अश्विनचा हा चेंडू सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे.
.@ashwinravi99 with a beauty 🔥🔥
Relive his magical delivery to dismiss Sikandar Raza #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/pcwVDt4JKc
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
दरम्यान, गुवाहाटीच्या बससापारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गज नाथन एलिस सामनावीर ठरला. एलिसने 4 षटकात 30 धावा दिल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच पंजाबला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजांचे योगदान देखील उल्लेखनीय राहिले. सलामीला आलेला कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. धवनने नाबाद 86 धावा केल्या, तर प्रभसिमरनने 60 धावांचे योगदान दिले. (Ravichandran Ashwin clean bowled Sikander Raza with a carrom ball)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता बास झालं! सूर्याच्या बॅटमधून पडणार धावांचा पाऊस; खुद्द ‘मिस्टर 360’ने दिलाय पठ्ठ्याला सल्ला
डिविलियर्सने पुन्हा दुखावली RCBच्या चाहत्यांची मने! म्हणाला, ‘हा’ संघच बनणार IPL 2023चा चॅम्पियन