भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची ताजी मुलाखत चर्चेचा विषय बनलेली आहे. अश्विनने या मुलाखतीत आपल्या पत्नीशी झालेली चर्चा देखील सांगितली आहे. आयपीएल 2023 पूर्ण फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका अश्विनसाठी शेवटची ठरू शकते, असे थेट संकेतच त्याने आपल्या पत्नीला दिले होते.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. माध्यमांमध्ये सध्या या मुलाखतीची चांगलीच चर्चा आहे. अश्विन या मुलाखतीत असेही म्हणाला आहे की, “जेव्हा मी डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशणून मायदेशी परतलो, तेव्हा मी माझी पत्नीला पृथ्वीला म्हटलो की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिका माझ्यासाठी शेवटची ठरू शकते. माझ्या गुडघ्याला अडचणी येत आहेत आणि ऍक्शन बदलण्याच्या विचारही करत आहे.”
अस्विन पुढे म्हणाला की, “बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सुज वाढली होती. यानंतर मी आफल्या 2013-14मधल्या ऍक्शनवर परतलो. नंतर या दुखापतीवर काम करण्यासाठी बेंगलोर स्थित एनसीएमध्ये गेलो. नंतर गोलंदाजी सुरू केली आणि गुडघ्याच्या वेदनेतूनही आराम मिळाला.” दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील मालिकेत अश्विन मालिकावीर देखील ठरला होता.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23 मध्ये अश्विनने भारतीय संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. मात्र, तरीही डब्ल्यूसीटीच्या अंतिम सामन्यावेळी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने खेळपट्टीचे कारण देत त्याला संघातून बाहेर बसवले. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर स्वतः अश्विन देखील नाराज आहे. याविषयी तो म्हणाला की, “असा निर्णय का घेतला गेला, याचे उत्तर कठीण आहे. पण मला अंतिम सामन्यात खेळायला आवडले असते.”
दरम्यान, 36 वर्षीय अश्विन भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनिल कुंबळ यांच्यानंतर दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी 92 कसोटी, 113 वनडे आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण 474 विकेट्स घेतल्या आहेत. येत्या काळात अश्विनचा आकडा लवकरच 500 कसोटी विकेट्सपर्यंत जाऊ शकतो. (Ravichandran Ashwin could play his last match against Australia! Discussion with wife)
महत्वाच्या बातम्या –
“तुम्ही एका रात्रीत सगळे बदलू शकत नाही”, टीम इंडियाच्या समर्थनात उतरला दिग्गज
VIDEO । ऑस्ट्रेलियाला माहागत पडली ब्रॉडची ओव्हर! लागोपाठ चेंडूवर घेतल्या महत्वाच्या विकेट्स