वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना आर अश्विन हा चांगलाच चमकला आहे. त्याने सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉल याला त्रिफळाचीत बाद करत यजमान संघाला पहिला झटका दिला. यावेळी तेजनारायण फक्त 12 धावा करून तंबूत परतला. यासह अश्विनने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज बनला आहे.
काय आहे अश्विनचा विक्रम?
खरं तर, कसोटी क्रिकेटमध्ये बाप-लेक जोडीला बाद करणारा आर अश्विन (R Ashwin) पहिलाच भारतीय गोलंदाज बनला आहे. यापूर्वी अश्विनने सन 2011मध्ये तेजनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) याचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul) याला बाद केले होते. अशात आता त्याने तेजनारायणला बाद केले.
‘असा’ विक्रम करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये बाप-लेक जोडीला बाद करणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी कोणत्याच भारतीय गोलंदाजाला कसोटीत बाप-लेक जोडीला बाद करण्यात यश आले नव्हते. खरं तर, तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul Father Shivnarine Chanderpaul) हा वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू राहिला आहे. त्याने कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवनारायणने वेस्ट इंडिज संघाकडून 164 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 11867 धावा, 268 वनडे सामने खेळताना 8778 धावा आणि 22 टी20त 343 धावा केल्या आहेत.
Pic 1- Ashwin dismissed Shivnarine (2011, Delhi)
Pic 2- Ashwin dismissed Shivnarine’s son Tegnarine (2023, Dominica)#WIvIND pic.twitter.com/snsc7tLoVQ
— Daya sagar (@DayaSagar95) July 12, 2023
तेजनारायण चंद्रपॉलची कारकीर्द
शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul Son Tagenarine Chanderpaul) याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने विंडीज संघाकडून आतापर्यंत फक्त 6 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, तेजनारायणला वनडे आणि टी20 संघात खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्याने 6 कसोटीत 453 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 1 शतक, 1 द्विशतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, त्याने या धावा 45.30च्या सरासरीने आणि 42.41च्या स्ट्राईक रेटने चोपल्या आहेत. 207 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने 2022मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पदार्पण केले होते. (ravichandran ashwin first indian bowler to take wicket of father and son in test tagenarine chanderpaul shivnarine chanderpaul ind vs wi Test)
महत्वाच्या बातम्या-
विंडीजविरुद्ध अश्विनची सिंहगर्जना! 5 विकेट्ससह अँडरसनला पछाडत बनला ‘असा’ कारनामा करणारा टॉपर सक्रिय खेळाडू
Video- जीवाची पर्वा न करता सिराजने डाईव्ह मारत पकडला अद्भुत कॅच, 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान