---Advertisement---

एका स्पिनरने घडविलेला इतिहास पाहून दुसरा स्पिनर खूश; अश्विनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पहिल्या डावात ११० षटकांमध्ये सर्व गडी गमावत भारताने ३२५ धावा जमवल्या. भारताच्या या डावात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने भारताच्या सर्वच्या सर्व १० फलंदाजांना बाद करत इतिहास रचला. यानंतर तो ड्रेसिंग रूमकडे परत येत असताना, सर्व चाहते त्याला उभे राहून अभिवादन करत होते. त्याचवेळी भारताचा प्रमुख क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानेदेखील त्याला तशीच दाद दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एजाजने रचला इतिहास
जन्माने मुंबईकर असलेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारा एजाज पटेल मुंबई कसोटीचा हिरो बनला. त्याने चक्क भारताचे सर्व १० गडी बाद करण्याची कामगिरी करून दाखवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी यापूर्वी इंग्लंडचे दिग्गज जिम लेकर व भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी करून दाखवली होती. आता या क्लबमध्ये पटेलचाही समावेश झाला आहे.

अश्विनने केले कौतुक
एजाज पटेलने भारताचा अखेरचा फलंदाज मोहम्मद सिराज याला बाद केल्यानंतर १० बळींचा मैलाचा दगड पार केला. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना त्याने न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व केले. मुली मैदानातील सर्व चाहते व व दोन्ही संघातील खेळाडू त्याला उभे राहून अभिवादन करत होते. भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा एजाजच्या कामगिरीनंतर भलताच खूश दिसला. त्यानेदेखील अत्यंत आनंदाने त्याचे कौतुक करत अभिवादन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत असून, सर्वजण अश्विनची स्तुती करताना दिसत आहेत.

अश्विनची भेदक गोलंदाजी
भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला जास्त काळ टिकाव धरू दिला नाही. मोहम्मद सिराज याने सुरुवातीचे तीन फलंदाज बाद केले. त्यानंतर, अश्विनने ८ षटकात फक्त ८ धावा देऊन ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. परिणामी, न्यूझीलंडचा संघ केवळ ६२ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताकडे ३३२ धावांची आघाडी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

साहेबांनी थोपटली पाठ! एजाजच्या पराक्रमाची शरद पवारांकडूनही दखल, मोजकेच शब्द पण पोटभर कौतुक

…म्हणून पुण्यात २१ वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास

HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---