भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करत आहेत. गेल्या वर्षभरापासून भारतावर कोरोनाचे संकट आहे. पण गेल्या २ महिन्यांच कोरोना संकटाच्या धोक्याने परिसीमा गाठली आहे. रोज देशात लाखोंमध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. अशातच वैद्यकिय सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक खेळाडू, सेलिब्रेटी, सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने देखील ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी एन९५ (N95) मास्क खरेदी करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.
अश्विनने शुक्रवारी (७ मे) ट्विट केले होते की ‘मी सर्वांना विनंती करतो लसीचे डोस घ्या. सामाजिक अंतर पाळा आणि दोन मास्क घाला (कृपया कापडी मास्क घालू नका) या प्राणघातव व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी मदत करणार आहे.’
I urge everyone going to get their vaccine shot to keep a safe distance from one another and double mask. ( no cloth masks pls) . The very point of getting a vaccine is to fight this deadly virus, let’s not make that hopeful idea into a cluster. #COVID19India
— Ashwin ???????? (@ashwinravi99) May 7, 2021
अश्विनच्या या ट्विटवर त्याला अनेक प्रतिक्रिया आल्या. एका ट्विटरकर्त्याने प्रतिक्रिया देताना लिहिले की ‘एक N95 मास्क ७० रुपयांना मिळतो. एक सर्जिकल मास्क १० रुपयांना मिळतो, जो आपण ८ तासांपेक्षा जास्त वापरु शकत नाही. जे लोक खाण्यासाठीही पैसे मिळवताना संघर्ष करत आहे, ते यासाठी पैसे कोठून मिळवतील?
https://twitter.com/im_mano12/status/1390544126374907905
यावर उत्तर देताना अश्विनने लिहिले होते की ‘N95 मास्क धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते. मला अशा लोकांना मास्क खरेदी करुन देण्याचा आनंद होईल, ज्यांना मास्क घेणे शक्य नाही. कृपया मला सांगा की मी गरजूंपर्यंत मास्क कसे पोहतवू शकतो.’
याशिवाय आणखी एका ट्विटरकर्त्याने प्रतिक्रिया दिली होती की ‘लसीचा दुसरा डोस घेण्याची माझी अंतिम तारिख २१ मे आहे. पण कोणतेही लसीकरण केंद्र उपलब्ध नाही.’
यावर अश्विनने उत्तर देताना लिहिले की ‘मी एवढेच सांगू शकतो की तुमच्यासाठी उपलब्ध होईपर्यंत वाट पाहा. आपण कोट्यावधी लोक असलेल्या देशात राहातो. तोपर्यंत सुरक्षित राहा.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1390545510046453762
अश्विनने यापूर्वीही वेळोवेळी कोरोनाबद्दल जनजागृती केली आहे. तसेच यापूर्वीही त्याने म्हटले होते की ‘कोणाला काही मदत हवी असल्यास मला सांगा. माझ्या परीने होईल तशी मदत करण्याचा मी प्रयत्न करेल.’
अश्विनने घेतली होती आयपीएल २०२१ मधून माघार
काहीदिवसांपूर्वी इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. पण हा हंगाम स्थगित करण्यापूर्वीच आर अश्विनने या हंगमातून ५ सामने खेळल्यानंतर कोरोनाच्या कारणामुळेच माघार घेतली होती. त्याने माघार घेतल्यानंतर काही दिवसांनी असे समजले होते की त्याच्या कुटुंबातील १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी सौंदर्यवतीने भारतीयांनाही लावलं याड, झालं असं काही की होऊ लागली अनुष्काशी तुलना






