कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सातत्याने क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करताना बऱ्याचशा समस्या उद्भवत असतात. मग या समस्या शारिरिक असू शकतात किंवा मानसिक. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) यालाही २०१७ ते २०१९ दरम्यान भरपूर दुखापती झाल्या होत्या. अश्विनने याच दुखापतींविरुद्ध आपण दिलेल्या लढ्याविरुद्धचा (Ashwin Recalls Struggle Injuries) उलगडा केला आहे. ३५ वर्षीय अश्विनला ‘पेटेलर टेंडोनिटिस’मुळे चालताना प्रंचड वेदना होत असल्याचे त्याने सांगितले आहे.
‘द मंथली’ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अश्विनने एका-नंतर-एक दुखापतींचा सामना कसा केला आणि त्यातून तो बरा कसा झाला?, याबद्दल खुलासे केले आहेत.
तो म्हणाला की, “जेव्हा शारिरिक तयारीची गोष्ट येते, तेव्हा २०१७ ते २०१९ नंतर मला सर्वात आधी जखम झालेली ती पेटेलर टेंडोनिटिसची. या दुखापतीत तुम्ही क्रिकेट खेळू शकता. परंतु या दुखापतीची खास बाब अशी की, यामुळे गुडघे गरम होत नाहीत. मात्र यामुळे मला सकाळी चालतानाही वेदना होत असायच्या. जसाजसा दिवस मावळत असायचा, तसतसे माझे गुडघे खुले होत असायचे. पण यादरम्यान तुम्ही जॉगिंग करू शकत नाही. यातून बरे होण्यासाठी कमीत कमी २-३ फेऱ्या माराव्या लागत होत्या. पण या वेदना कधीच पूर्णपणे कमी झाल्या नाहीत.”
पुढे बोलताना अश्विनने सांगितले की, या दुखापतीमुळे त्याच्या उजव्या पायावर परिणाम झाला होता, ज्यामध्ये त्याला उड्या मारण्यातही अडचण होत असायची. आपल्या दुखापतीविरुद्धच्या संघर्षाविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, “चेंडू फेकण्याआधी गोलंदाजाला छोटीशी उडी घ्यावी लागते. यावेळी गोलंदाजाला एका पायावर जोर दिल्यानंतर त्वरित दुसरा पाय उचलावा लागतो. परंतु दुखापतीदरम्यान असे करणे खूप आव्हानात्मक होते. पुढे यामुळे माझ्या डाव्या पायावरही प्रभाव पडू लागला, कारण त्या पायाला जास्त वजन पेलावे लागत असायचे.”
परंतु अश्विनसाठी गोष्टी अजूनच कठीण तेव्हा बनल्या, जेव्हा त्याला ऍथलेटिक पुबालगिया नावाची दुखापत झाली. त्याच्या म्हणण्यानुसार, ही दुखापत त्याच्या पहिल्या दुखापतीचे मोठे रूप होते. या दुखापतीमुळे गोलंदाजीवर काय परिणाम झाला हे सांगताना अश्विन म्हणाला की, “शरीराचा प्रत्येक भागाला याची भरपाई करावी लागत होती. पुढे मी वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करायला सुरू केली. ऍथलेटिक पुबालगियामुळे नेहमी साईड ऑन पोजिशनमध्ये थांबणे कठीण होते. यामुळे १० षटके गोलंदाजी केल्यानंतर अचानक शरीरात अजिबात उर्जा राहत नसे. पुढे मला ओटिपोटितही दुखापत झाली. या दुखापतींचे माझ्या शरीरावर खूप दागही पडले आहेत.”
मात्र या दुखापतींमधून पूर्णपणे बरे झाल्यानंतर अश्विनने क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त पुनरागमन केले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने या मालिकेतील २ सामन्यात ११.३६ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो मालिकावीरही बनला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
यशस्वी भव! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळाला ‘मास्टर क्लास’
पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी