---Advertisement---

फोटो ऑफ द डे! 100व्या कसोटीसाठी अश्विनसोबत फॅमिलीही मैदानात, द्रविडकडून मिळाली खास कॅप

Rahul Dravid, Ravichandran Ashwin and his Family
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील धरमशाला कसोटी गुरुवारी (7 मार्च) सुरू झाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. भारताने 3-1 अशी विजयी आघाडी आधीच घेतली आहे. पण शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्यासाठी हा कसोटी सामना खऱ्या अर्थाने खास आहे.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) मागच्या दशकातील भारताचा सर्वोत्तम फिरकीकटू ठरला, असे आपण म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमद्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अश्विनचा दुसरा क्रमांक आहे. गुरुवारी (7 मार्च) अश्विनने कसोटी कारकिर्दीतील आपला 100वा सामना खेळण्यासाठी मैदानात पाय टाकला. भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा अश्विन 14वा क्रिकेटपटू ठरला. याआधी ही कामगिरी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीवीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, विराट कोहली, ईशांत शर्मा, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि विरेंद्र सेहवाग यांनी केली होती.

अश्विन गुरुवारी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात आला तेव्हा भारतीय खेळाडूंकडून त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांनी अश्विनला 100कसोटी सामने पूर्ण केल्यानिमित्त खास कॅप दिली गेली. यावेळी अश्विनचे कुटुंब देखील मैदानात उफस्थित होते. त्याची पत्नी प्रीती आणि दोन्ही मुली अश्विनकडे पाहताना दिसल्या. या चौघांचा सोबतचा फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Ravichandran Ashwin received a special cap from Rahul Dravid on his 100th Test.)

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ – 
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
तीन स्पिनर्स की तीन वेगवान गोलंदाज?, अंतिम कसोटीसाठी टीम इंडियाचं गोलंदाजी कॉम्बिनेशन काय?
धरमशाला कसोटीसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल; एकाचे पदार्पण, तर एकाचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---