आयपीएल 2023 चा 64 वा सामना पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 15 धावांनी निर्णायक विजय मिळवला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता पंजाबचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पंजाबने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र, त्यांना थोडक्यात अपयश आले. असे असताना संघाने एक वेगळी शक्कल लावत सामना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न देखील केला.
दिल्लीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब पुढे 214 धावांचे मोठे लक्ष ठेवले होते. कर्णधार शिखर धवन व प्रभसिमरन लवकर बाद झाल्यानंतर अथर्व तायडे व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी चांगली भागीदारी करत पंजाबला पुनरागमन करून दिले. अथर्व याने हंगामातील आपले दुसरे अर्धशतक यावेळी पूर्ण केले. मात्र, त्यानंतर त्याने व संघ व्यवस्थापनाने एक अजब निर्णय घेतला. तो चांगला खेळत असतानाच संघ व्यवस्थापनाने त्याला रिटायर्ड आऊट होत बाहेर बोलावले. त्याने मैदान सोडण्यापूर्वी 42 चेंडूत 55 धावांची खेळी केली. यात पाच चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.
संघाचा हा निर्णय फारसा उपयोगी ठरला नाही. कारण त्यानंतर फलंदाजीला आलेले जितेश शर्मा व शाहरुख खान हे एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. अखेरीस लिव्हिंगस्टोन व सॅम करन यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
टी20 क्रिकेटमध्ये मागील वर्षीपासून रिटायर्ड आऊट होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. एखादा फलंदाज वेगाने धावा काढण्यात अपयशी ठरत असल्यास स्वतः मैदान सोडतो. मागील आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विन याने राजस्थान रॉयल्ससाठी असाच निर्णय घेतला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट व लीग क्रिकेटमध्ये खेळाडू मोठ्या प्रमाणावर संघाची गरज ओळखून स्वतः बाहेर जाण्यास प्राधान्य देतात.
(Ravichandran Ashwin Retired Out Trend In IPL Atharva Taide Get Out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Breaking : 5 वर्षांनंतर घडला मोठा विक्रम! खलील अहमदने करून दाखवली भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! हवेत झेप घेत एका कॅप्टनने पकडला दुसऱ्या कॅप्टनचा कॅच, पाहा व्हिडिओ