ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. विश्वचषक भारतात होत असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला अनेकांनी विजेतेपदाचे दावेदार मानले आहे. अनेक माजी क्रिकेटपटू भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असे भाकीत करत असतानाच भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने मात्र ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषक उंचावण्याची अधिक संधी असल्याचे म्हटले आहे.
भारतीय संघाने 2011 मध्ये मायदेशात झालेला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर सलग दोन विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताला पराभूत व्हावे लागले. तर ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये आपल्या देशात झालेल्या विश्वचषक जिंकलेला. 2019 मध्ये ते देखील उपांत्य फेरीत पराभूत झालेले. भारतीय संघाला सर्वजण विजेतेपदाचे दावेदार मानत असताना, अश्विन एका मुलाखतीत म्हणाला,
“आगामी विश्वचषकात माझी पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. अनेक जण भारताला विजयाचे दावेदार मानत आहेत ज्यामुळे भारतीय संघावर दबाव वाढेल. याच दबावापासून संघाला दूर ठेवण्यासाठी मी ऑस्ट्रेलियाचे नाव घेईल. दबावाचा खेळावर नक्कीच परिणाम होतो.”
अश्विन याने ऑस्ट्रेलिया संघाला पसंती देताना दबावाचे कारण दिले असले तरी ऑस्ट्रेलिया संघ मजबूत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांनी विजय संपादन केला होता. विश्वचषकाच्या आधी देखील ते भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे जवळपास सर्वच खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांना येथील परिस्थितीचा चांगला अनुभव आहे. ऑस्ट्रेलिया निवड समितीने निवडलेल्या प्राथमिक संघात अनेक असे खेळाडू सामील आहेत जे एकहाती सामना जिंकून देऊ शकतात.
(Ravichandran Ashwin Said Australia Is Favorites For 2023 ODI World Cup Ahead India)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विश्वचषकाआधीच केएल राहुल दिसणार मैदानात
“मी नक्कीच तुम्हाला वर्ल्डकपमध्ये दिसणार”, कार्तिकच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया