बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात यजमान भारतीय संघाने 280 धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पण अश्विनबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यानेही सामना विजयात महत्त्वाचे योगदान दिले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पंतने झंझावाती शतक झळकावले. जवळपास दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने पहिल्या डावात 39 आणि दुसऱ्या डावात 109 धावा केल्या.
30 डिसेंबर 2022 रोजी रात्री पंत एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो इतक्या लवकर क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. आता पंतचे पुनरागमन आणि तुफानी खेळी यावर सामनावीर अश्विनची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पंतच्या दमदार पुनरागमनावर काय म्हणाला अश्विन?
रविचंद्रन अश्विनने पंतचे क्रिकेटच्या मैदानात चमत्कारिक पुनरागमन हे ‘देवाचा आशीर्वाद’ असे वर्णन केले. अश्विन म्हणाला की पंत नेहमी आत्मविश्वासाने भरलेला दिसतो आणि संघाकडून त्याच्यावर कोणतेही दडपण नसते.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर अश्विन म्हणाला, “मला वाटते की पंतच्या फॉर्मवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ नये. त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले आणि मैदानावर स्वत:ला सिद्ध केले, ते चमत्कारिक आहे. कदाचित हा देवाचा आशीर्वाद असावा. मला वाटत नाही की हा लोकांचा त्याच्यावर विश्वास होता. मला वाटते की त्याच्यावर कसलाही दबाव नव्हता. पंतने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आहे. चांगली गोष्ट ही आहे की, पंत परत आला आहे. पंत त्याच्या जुन्या शैलीत फलंदाजी करत आहे.”
पंतच्या फलंदाजीवर अश्विन म्हणाला, “तो खूप मनोरंजक आहे. पंतनंतर फलंदाजीला आलेले खेळाडू फारसे दिग्गज नाहीत. तुमची पाळी कधी येईल हे तुम्हाला माहीत नसते, पण मला वाटते की त्याला आणखी चांगले व्हायला आवडेल. पंतमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नव्हती. आणि तो नेहमी आत्मविश्वासाने भरलेला होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
नताशासोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मुलाला भेटून हार्दिक भावूक; फोटो पोस्ट करत लिहिले…
भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घालवली होती इज्जत, दिग्गजाने केला पाकिस्तानचा गौप्यस्फोट
PAK vs ENG: चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी पाकिस्तानला जोरदार झटका, कोटींचे नुकसान