जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची नवी वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजी क्रमवारी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एकतर्फी वर्चस्व गाजवत पहिल्या तिन्ही स्थानांवर कब्जा केला. गोलंदाजी क्रमवारीत भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज दिसून येतात. मात्र, त्याचवेळी भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व सध्या दुखापतग्र असलेला भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यामुळे या क्रमवारीत भारतीय संघाची लाज काही प्रमाणात वाचल्याचे दिसते.
नवे कसोटी चॅम्पियन बनलेल्या ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज या क्रमवारी पहिल्या तिन्ही क्रमांकावर विराजमान आहेत. मार्नस लॅब्युशेनने आपले पहिले स्थान अबाधित राखले असून, भारताविरुद्ध अंतिम सामन्यात शतके झळकावणारे स्टिव्ह स्मिथ व ट्रेविस हेड हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर दिसून येतात. पहिल्या दहामध्ये भारताचा एकमेव फलंदाज रिषभ पंत असून, तो दहाव्या क्रमांकावर विराजमान आहे. विशेष म्हणजे पंत आपला अखेरचा सामना मागील वर्षी खेळला होता. त्यानंतर बाराव्या क्रमांकावर कर्णधार रोहित शर्मा तर तेराव्या क्रमांकावर विराट कोहली दिसून येतो.
गोलंदाजी क्रमवारीचा विचार केल्यास रविचंद्रन अश्विन याने देखील आपले क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. भारतीय संघाचा दुसरा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजा हा या क्रमवारीमध्ये आठव्या तर, मागील अनेक दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला जसप्रीत बुमराह नवव्या क्रमांकावर काबीज आहे. या यादीमध्ये इंग्लंडचे जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व ओली रॉबीन्सन हे तीन वेगवान गोलंदाज दिसून येतात. तर ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स व नॅथन लायन पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये सामील आहेत.
(Ravichandran Ashwin Top ICC Test Bowling Rankings Rishabh Pant Only Indian In Top 10 Batter)
महत्वाच्या बातम्या –
ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियन संघाने केली इतिहासाची पुनरावृत्ती; 39 वर्षांनंतर घडला ‘हा’ योगायोग
VIDEO । एका चेंडूत खर्च केल्या 18 धावा, भारतीय गोलंदाजाचा नकोसा विक्रम!