नुकतीच मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी पार पडली. या कसोटीत भारताने श्रीलंका संघाचा १ डाव आणि २२२ धावांनी पराभव केला. या कसोटीत अनेक विक्रम पाहायला मिळाले. या सामन्यादरम्यान अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने भारतीय गोलंदाज कपिल देवचा विक्रम मोडला आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४३५ धावांचा टप्पा ओलांडत कपिल देवचा विक्रम मोडला.
याच आर अश्विनची (Ravichandran Ashwin) तुलना सातत्याने माजी भारतीय गोलंदाज हरभजन सिंगसोबत (Harbhajan Singh) होत असते. यातच आता भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) अश्विन आणि हरभजन यांच्यात श्रेष्ठ कोण? या वादावर आपले मत मांडले आहे. यावेळी गौतम गंभीरने दोघांची तुलना केली आहे.
हरभजन आणि अश्विन या दोघांच्याही नावावर ४०० हून अधिक विकेट्स आहेत. त्यामुळे त्यांची सतत एकमेकांशी तुलना केली जाते, यावर बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “एका फलंदाजाच्या रुपात मला आर अश्विनचा सामना करण्यास नाकारेन. परंतु मला हरभजन सिंगला पुन्हा गोलंदाजी करताना पाहायला आवडेल. डाव्या हाताचा फलंदाज म्हणून मला नेहमी वाटायचे की, अश्विन मला बाद करु शकतो, परंतु एक विश्लेषक म्हणून हरभजनकडे ती क्षमता आहे आणि तो चेंडू डिप करु शकत होता. डाव्या हाताच्या कोणत्याही फलंदाजाला अश्विनचा सामना करणे खुप कठीण आहे. कारण तो त्याच्या गोलंदाजीचा वेग सतत बदलत असतो, त्यामुळे फलंदाजांना त्याच्या चेंडूचा सामना करणे खुप कठीण जाते.”
नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेदरम्यान अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकत भारतातील तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला होता आणि आता मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीदरम्यान भारतीय दिग्गज कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. सध्या तो सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळे आहे. अनिल कुंबळेने ६१९ विकेट घेतल्या आहेत. तर आर अश्विन अशी कामगिरी करणारा जगातील नववा गोलंदाज बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
जो रूटचा अंदाज चुकला, स्टंपला कव्हर करत विकेट वाचवण्याच्या नादात दांड्याच उडून पडल्या- VIDEO
टी२० विश्वचषक खेळला जाणार बदललेल्या नियमांनुसार, १ ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ कायदे
वाॅर्नचे खांदे कसे बनले मजबूत?, अश्विनने सांगितली द्रविडकडून ऐकलेली बालपणीची कहाणी