---Advertisement---

रविंद्र जडेजा, एमएस धोनीने केली ही खास सेंच्यूरी पूर्ण…

On: शुक्रवार, एप्रिल 12, 2019 4:27 PM
---Advertisement---

जयपूर। गुरुवारी(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच चेन्नईचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीने एक खास शतक पूर्ण केले आहे.

जडेजाने आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेणारा एकूण 10 भारतीय क्रिकेटपटू तर एकूण 13 वा खेळाडू ठरला आहे.

त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 20 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने राजस्थानचे फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि राहुल त्रिपाठी यांना बाद केले. त्यामुळे आता त्याचे आयपीएलमध्ये 161 सामन्यात 100 विकेट्स झाल्या आहेत.

तसेच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 100 विजय मिळवणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 166 सामने खेळले असून त्याने 100 विजय आणि 65 पराभव स्विकारले आहेत.

त्याच्या नावावर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ गौतम गंभीर आहे. गंभीरने 129 सामन्यात नेतृत्व करताना 71 सामन्यात विजय मिळवला आहे.

#आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार – 

100 विजय – एमएस धोनी (सामने 166)

71 विजय – गौतम गंभीर (129 सामने)

54 विजय – रोहित शर्मा (94 सामने)

44 विजय – विराट कोहली (102 सामने)

35 विजय – ऍडम गिलख्रिस्ट (74 सामने)

#आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज – 

157 – लसिथ मलिंगा

149 – अमित मिश्रा

144 – पियूष चावला

143 – ड्वेन ब्रावो

141 – हरभजन सिंग

123 – भुवनेश्वर कुमार

118 – आर अश्विन

115 – सुनील नारायण

113 – उमेश यादव

106 – आशिष नेहरा

105 – विनय कुमार

102 – झहिर खान

100 – रविंद्र जडेजा

महत्त्वाच्या बातम्या – 

नो बॉल प्रकरणी धोनी का गेला अंपायरकडे, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खूलासा

भर मैदानात अंपयारशी वाद एमएस धोनीला पडला महागात…

ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment