वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी मैदान मारले. एकेकाळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. या विजयासह भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी कमाल प्रदर्शन करत इतिहास घडवला आहे. ही जोडी असा विक्रम करणारी पहिलीच भारतीय जोडी बनली आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 114 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने 115 धावांचे आव्हान ईशान किशन याच्या 52 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स राखून 118 धावा चोपत पार केले आणि सोपा विजय मिळवला. तत्पूर्वी विंडीजच्या डावात भारतीय फिरकीपटूंनी सर्वाधिक विकेट्स घेत इतिहास रचला.
जडेजा-कुलदीपचा विक्रम
या सामन्यात कुलदीप यादव याने 4 विकेट्स चटकावल्या, तर रवींद्र जडेजा याने 3 विकेट्स नावावर केल्या. यानंतर आता जडेजा आणि कुलदीप (Jadeja And Kuldeep) भारतीय क्रिकेट इतिहासात एका वनडे सामन्यात 7 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारी पहिली फिरकी जोडी बनली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1684596540692639744
सामन्यातील प्रदर्शन
जडेजाने सामन्यात 6 षटके गोलंदाजी करत 37 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स घेतल्या. तसेच, जडेजाने बॅटमधूनही नाबाद 16 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच, कुलदीप यादवनेही सामन्यात 3 षटके गोलंदाजी केली. त्याने यावेळी 2 षटके निर्धाव टाकली आणि फक्त 6 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या.
जडेजाचा असाही विक्रम
जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 3 विकेट्स घेताच खास विक्रम नावावर केला. तो वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत 44 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने कपिल देव (43) आणि अनिल कुंबळे (41) यांचा विक्रम मोडीत काढला. आता जडेजा भारताकडून वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. (ravindra jadeja and kuldeep yadav created history in 1st odi against west indies )
महत्त्वाच्या बातम्या-
भारताने विजय मिळवूनही कर्णधार रोहित दु:खीच! म्हणाला, ‘अपेक्षाच नव्हती की, आम्ही 5…’
पहिल्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय! कुलदीप-जड्डूनंतर ईशान चमकला






